congress nana patole target bjp girish mahajan over Simhastha Nashik Kumbh Mela
Simhastha Nashik Kumbh Mela : नागपूर : लवकरच नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक देखील पार पडली आहे. मात्र महायुतीमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीवरुन आणि श्रेयावरुन वाद निर्माण झाला आहे. नाशिकचे पालकमंत्रिपदावरुन हा वाद चिघळला असून भाजप व शिंदे गटाचे नेते हे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आहेत. यावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या रस्सीखेचवर देखील नाना पटोले यांनी भाष्य केले. पटोले म्हणाले की, या सरकारमधील सर्व गोंधळ आहे. सिंहस्थ कुंभमेळा नाशिक मध्ये होत असताना श्रेयवादाची लढाई पहिल्या दिवसापासून सुरू आहे. छगन भुजबळ तर नंतर मंत्री झाले. भुजबळ तेल लावलेले पैलवान आहे. ते तेल लावून काय काय करतील हे यानंतर समजेल. गिरीश महाजन भुजबळ यांच्यासमोर बच्चे आहे, असा टोला नान पटोले यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचं आम्हाला काही सोयर सुतक नाही
त्याचबरोबर मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. याबाबत ते म्हणाले की, आमच्यासाठी हे काही महत्त्वाचे नाही. मुख्यमंत्र्यांना भेटायला कोण गेलं याचा आम्हाला सोयर सुतक नाही. आमच्यासाठी रस्त्यात खड्डे पडले असे लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहे. कोण कोणाला भेटलं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही. दोघे भाऊ एकत्रित येत असेल, तर त्याला विरोध करण्याचा कारण नाही. मात्र कोण कोणाला भेटले याचं काही सोयर सुतक नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जो कोणी अनपढ कुमार निवडणूक आयोगात आलेला
निवडणूक आयोगाने मतचोरी केली असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केली जात आहे. याबाबत नाना पटोले म्हणाले की, खरं तर निवडणूक आयोगावर आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. निवडणूक आयोगाने अनेक चुकीचे ट्विट केले. मतदानाच्या दिवशी अनेक वेळेला मतदानाची टक्केवारी बदलली. मतदानाच्या अखेरच्या टप्प्याचे फुटेज मागितले, तर सांगतात आया बहिणीचे इज्जत जाईल, काय संबंध आहे. जो कोणी अनपढ कुमार निवडणूक आयोगात आलेला आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.