Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाबळेश्वरला संसर्ग! वेण्णा तलावात विष्ठा मिसळल्याने पर्यटक, स्थानिकांना आजारांची लागण

महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटक घोड्यांवरुन रपेट मारण्याचा आनंद लुटतात. मात्र, या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वरमध्ये एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

  • By Aparna
Updated On: Jan 07, 2024 | 02:55 PM
महाबळेश्वरला संसर्ग!  वेण्णा तलावात विष्ठा मिसळल्याने पर्यटक, स्थानिकांना आजारांची लागण
Follow Us
Close
Follow Us:

पाचगणी : महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटक घोड्यांवरुन रपेट मारण्याचा आनंद लुटतात. मात्र, या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वरमध्ये एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे. ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे संपूर्ण महाबळेश्वर व महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर पाचगणी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएसडी) या संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प’ हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी महाबळेश्वरची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रा. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केले. महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी व पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड या विकारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे कारण शोधल्यानंतर घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळत असून, त्याद्वारे ती नागरिकांच्या पोटात जाऊन गंभीर आजार होत असल्याचे दिसून आले आहे.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वेण्णा नदीच्या उगम स्थान असणाऱ्या जागेवर वेण्णा लेक तलाव बांधला आहे मोठ्या प्रमाणात या लेख मध्ये पाण्याचा साठा होत असतो.  वसन वर्ष या परिसरात हॉर्स रायडिंग होत आहे. इंग्रजांच्या काळापासून या परिसरात हॉर्स रायडिंग ला विशेष महत्त्व आहे. सध्या या परिसरात हजारो घोडेस्वार परिसरात हॉर्स रायडिंगवर आपली उपजीविका करत असतात. मात्र नव्याने आलेल्या या अहवालामुळे घोडे चालक-मालक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून त्यांच्या रोजगार आणि उपजीविकेचा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे.  वेण्णा तलावातून पाचगणी येथील प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा केला जातो. वर्षानुवर्ष या तलावातून प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना संपूर्ण पाचगणी शहरासह परिसरात पाण्याचा पुरवठा केला जातोय. मात्र नेमकी पाण्यात दूषितिकरण कशामुळे झाले याचा अहवाल भलेही गोखले इन्स्टिट्यूटने दिला असला तरी याच तलावातील पाण्यात परिसरातील असणाऱ्या पंचतारांकित हॉटेलचे ड्रेनेज आणि सांडपाणी जात असल्याचे धक्कादायक माहिती येथील  घोडागाडी चालक-मालक व घोडेमालकांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे.  त्यामुळे तलावातील पाणी नेमके घोड्यांमुळे दूषित झाले आहे की, अन्य काही कारणांमुळे याचा  तपासणीचा अहवाल देखील सादर व्हावा, अशी मागणी घोडे मालक-चालक यांनी केली आहे.

वेण्णा लेक परिसरातील पंचतारांकित हॉटेलचे सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी याच तलावात सोडले जात असल्याची माहिती स्थानिक सांगतात.  त्यामुळे संबंधित हॉटेल्स वर एसटीपी चे कोणतेही प्लांट अवेलेबल नाहीत या हॉटेलमधून निघणारे सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी याच तलावात सोडले जात आहेत त्यामुळे दूषित पाण्यात आणखीन भर होत आहे प्रदूषण विभाग व प्रदूषण मंडळाने व संबंधित नगरपालिकेने तलावाच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व हॉटेलची सांडपाण्याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Contagion to mahabaleshwar tourists locals get sick due to faeces mixing in venna lake nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 02:55 PM

Topics:  

  • Pachgani
  • Satara News

संबंधित बातम्या

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती
1

महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती

Satara News :  महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?
2

Satara News : महाविकास आघाडीची साताऱ्यात कमराबंद खलबते; मित्र पक्षांसाठी जागेचा फॉर्म्युला ठरला ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.