Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Construction worker scheme : पैसे द्या अन् बांधकाम कामगार व्हा..; माणमध्ये एजंटगिरी आणि भ्रष्टाचार फोफावला

माणमध्ये बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंटाची टीमच येथे सक्रीय झाली आहे. यामधून एजंटगिरी आणि भ्रष्टाचार फोफावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2026 | 01:06 PM
Corruption started by agents in the construction worker scheme Satara News

Corruption started by agents in the construction worker scheme Satara News

Follow Us
Follow Us:
  • माणमध्ये भ्रष्टाचार आणि टक्केवारीला उधाण
  • बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्याची एजंटगिरी
  • खरे कामगार योजनेपासून वंचित
म्हसवड : महेश कांबळे : राज्य शासनाने बांधकाम मजुरांना आर्थिक बळकटी देण्यासाठी बांधकाम कामगार योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थी बांधकाम कामगारांना घरकुलासाठी आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती ही दिली जात असल्याने बांधकाम कामगारांसाठी (Construction Workers) ही योजना वरदान ठरली आहे, मात्र या योजनेचा लाभ खऱ्या बांधकाम कामगारांना न मिळता तो बोगस कामगारांना दिला जात असून हा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन एजंटानी शासनाचीच लुट सुरु केली असल्याचा प्रकार माण तालुक्यात घडत आहे. (Satara News)

बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंटाची टीमच येथे सक्रीय झाली असून प्रत्येक एजंट असा लाभ मिळवून देण्यासाठी गिऱ्याईक शोधत आहे, यामध्ये महिला एजटांचाही समावेश आहे.  प्रत्येकाची टक्केवारी ही वेगवेगळी असली तरी येथे सक्रीय असलेल्या महिला एजटांची फी ही मिळणाऱ्या लाभाच्या अर्धी असल्याने ५० टक्के रक्कम द्या आणी बांधकाम कामगार व्हा असा अलिखीत अजेंडाच जणू या महिलांनी काढला आहे. आजवर शेकडो अनाधिकृत बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ उठवला आहे.

हे देखील वाचा : रायगडमध्ये भाजपला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ? जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे गणित

दिवसभर बांधकामावर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करणारा खरा बांधकाम कामगार मात्र या योजनेपासून वंचीतच राहिलेला आहे, तर ज्याने कधी बांधकामाचे खोरे, फावडे हातात धरलेच नाही ज्याला कधी या कामगारांच्या व्यथा समजल्याच नाही, ज्याकडे चारचाकी वाहने आहेत, जे बंगल्यात राहतायेत अशांनीच या योजनेचा अधिक लाभ घेतल्याची वस्तुस्थिती आहे. शासनाने या योजनेसाठी जे निकष लावले आहेत ते सर्व निषक डावलून जर अनाधिकृत बांधकाम कामगारांना लाभ मिळाला असेल तर यामध्ये ती बोगस व्यक्तीच कारणीभूत नाही तर त्यांना याचा लाभ मिळवून देणाऱ्या एजटंसह त्यांचे अर्ज पात्र ठरवणारे अधिकारीही त्यामध्ये दोषी ठरवले गेले पाहिजेत.

गत काही वर्षापासून माण तालुक्यातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, तर आज ही प्रामाणिक व गरिब बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे आजवर या योजनेचा लाभ किती जणांनी घेतला आहे, त्यातील बोगस लाभार्थी किती आहेत, या योजनेत नक्की काही घोटाळा झाला ? याची सखोल चौकशी होऊन संबधितांवर योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता खऱ्या बांधकाम कामगार वर्गासह सर्व स्तराून होत आहे.

हे देखील वाचा : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

दरम्यान बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ४ टप्पे असून यातील पहिला टप्पा हा कामगार नोंदणीचा आहे, दुसरा टप्पा हा कामगार नुतनीकरणाचा आहे, तिसरा टप्पा हा लाभचा आहे तर चौथा हा इतर लाभाचा आहे, यातील प्रत्येक टप्प्याला एंजटाकडून पैसे उकळले जात आहेत. यासाठी शासकीय फी ही अत्यल्प असली तरी ती अशा एजटांमुळे भरमसाठ भ्रष्टाचार होत आहे. या एजटांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बळ मिळत असल्याने माणमध्ये एजंटगिरी फोवावली असून यामुळे मात्र खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. यावर संबंधित विभागाकडून गंभीरतेने पाऊले टाकली जाऊन ती पाऊले संबंधित गरजूंपर्यंत पोहचावी एवढी माफक अपेक्षा उपेक्षीतांकडून होत आहे. तर माण सह शेजारील तालुक्यातही अशा प्रकारे एजंट गिरी फोफावली असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Corruption started by agents in the construction worker scheme satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • corruption news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी
4

भैरवनाथाच्या देवस्थानात ‘विकासा’च्या नावाखाली सिमेंटचा मारा? काँक्रीटीकरणावर ठाकरे गटाचा सवाल; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.