Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pro Kabaddi League 11 : दबंग दिल्ली संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश; बंगाल वॉरियर्स संघावर शानदार विजय

कर्णधार आशु मलिक याच्या पल्लेदार चढायांच्या जोरावर दबंग दिल्ली संघाने बंगाल वॉरियर्सवर ४७-२५ अशी मात करीत प्रो कबड्डी लीग मध्ये प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले. मध्यंतराला सतरा गुणांची आघाडी घेत विजय निश्चित केला होता

  • By युवराज भगत
Updated On: Dec 16, 2024 | 11:20 PM
Dabang Delhi team enters the playoffs in the Pro Kabaddi League; Great victory over Bengal Warriors team

Dabang Delhi team enters the playoffs in the Pro Kabaddi League; Great victory over Bengal Warriors team

Follow Us
Close
Follow Us:

 

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दबंग दिल्ली संघाने आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी दहा सामने जिंकले होते. गेल्या पाच सामन्यांमध्ये त्यांनी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला तर एक सामना बरोबरीत ठेवला होता. आजचा सामना जिंकून प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय होते. त्यांच्या तुलनेमध्ये बंगाल वॉरियर्स संघाची कामगिरी निराशा जनक झाली आहे त्यांनी आतापर्यंत १८ सामने खेळले त्यामध्ये केवळ त्यांना पाच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. आजची लढत जर त्यांनी गमावली तर त्यांचे प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्नही भंगले जाण्याची शक्यता आहे.‌ त्यामुळेच दोन्ही संघांसाठी आजची लढत महत्त्वपूर्ण होती.‌

प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याच्या दृष्टीने दिल्ली संघाने सुरुवातीपासूनच आघाडी कशी राखता येईल हीच रणनीती आखली होती. दहाव्या मिनिटापर्यंत त्यांच्याकडे दोन गुणांची आघाडी होती. अर्थात बंगालच्या खेळाडूंनीही जिद्दीने त्यांना लढत दिली. बाराव्या मिनिटाला त्यांनी दिल्लीच्या अशू मलिक याची पकड करण्याचा आततायी प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि परिणामी कर्णधार फाजल अत्राचेली याच्यासह त्यांचे चार खेळाडू बाद झाले. त्यामुळे त्यांच्यावर लगेचच लोणही बसला. या लोणमुळे दिल्ली संघाने आघाडी दहा गुणांपर्यंत वाढवली. मध्यंतराला त्यांनी २६-९ अशी आघाडी घेतली होती.

उत्तरार्धात सुरुवातीलाच दिल्ली संघाने दुसरा लोण चढविला आणि आपली बाजू बळकट केली. त्यावेळी त्यांच्याकडे २९-१० अशी आघाडी होती. त्यानंतर त्यांनी आपली आघाडी आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे २३ गुणांची आघाडी होती.

दिल्ली संघाच्या विजयामध्ये आशु मलिक याच्या चढायांबरोबरच योगेश याने पकडी मध्ये केलेली अव्वल कामगिरी याचाही मोठा वाटा होता. बंगाल संघाकडून एस विश्वास व नितेश कुमार यांची लढत अपुरी ठरली.

Web Title: Dabang delhi team enters the playoffs in the pro kabaddi league 11 great victory over bengal warriors team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 11:20 PM

Topics:  

  • Dabang delhi
  • PKL 11
  • Pro Kabaddi League-11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.