सोलापूर : विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी दशसूत्री कार्यक्रम देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे होते. याप्रसंगी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर, डाएटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, अधिव्याख्याता इमानदार प्रमुख उपस्थित होते.
२०२२-२३ शैक्षणिक कामाचे नियोजन करणेसाठी व्हिजिट २२ ची प्रभावी अंमलबजावणी करा, असे सांगून सीईओ दिलीप स्वामी यांनी पालक-शिक्षकांच्या जबाबदारीवर विद्यार्थ्यांनी शाळेत पाठवितात. विद्यार्थ्याना स्पर्धाक्षम बनविण्यासाठी सक्षम करा. आरोग्यवर्धक व संस्कार क्षम शिक्षण द्या, असे भावनिक आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.
कोरोनाच्या काळात शिक्षकांनी घरी बसून देखील ऑनलाईन शिक्षण, पारावरची शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमासाठी दिलेले योगदान मी विसरू शकणार नाही. कोरोना काळात विद्यार्थी शिक्षकांपासून दूर गेले. परिणामी, त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कोरोना काळात झालेली हानी आपणास भरून काढायची आहे. दशसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा. मुख्याधापक व शिक्षकांच्या बैठका घ्या, असे आवाहन सीईओ दिलीप स्वामी यांनी केले.
शिकवताना मोबाईल बंद ठेवा
शाळेत जर शिकविताना मोबाईलची गरज नसेल तर मोबाईल बंद ठेवा. मोबाईलचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांवर होणार नाहीत याची काळजी घ्या. मोबाईलमध्ये विद्यार्थी आसक्त होणार नाहीत, याची काळजी घ्या. यामुळे गंभीर आजार देखील उद्भवू शकतात, याची जाणीव पालकांना करून द्या. कोरोनाकाळात पर्याय नव्हता. आता तरी काळजी घ्या, असे आवाहन दिलीप स्वामी यांनी केले.
शिक्षण विभागासाठी दशसूत्री
✔️गुणवत्ता पुर्ण शिक्षण प्रदान करणे
✔️स्पर्धाक्षम विद्यार्थी तयार करणे
✔️ आनंद दायी व नाविण्यपुर्ण शिक्षण
✔️ आरोग्य वर्धक व संस्कारक्षम शिक्षण
✔️ तंत्रस्नेही/ आयटीक्षम शिक्षण
✔️सुप्त गुण शोधून त्यास प्रोत्साहन
✔️ स्व अभिव्यक्ती प्रोत्साहन/ लेखक/ कवी निर्मिती
✔️ कौशल्य चिकित्सक विचार
✔️सृजन शिलता सहयोग, ज्ञानातील आधुनिकता गृहन करणे साठी
शिक्षकांनी प्रयत्न करणे
✔️ स्वावलंबन प्रवृतीला चालना व देशभक्ती
✔️ मातृपितृ भक्ती वाढविणे
✔️ गुरुकुल पध्दतीला उजाळा देत शंभर टक्के विद्यार्थी उपस्थिती.