Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Daund Nagarpalika: दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘वेट अँड वॉच’; उमेदवारीवर अद्याप निर्णय नाही

शहरातील मुस्लिम, मागासवर्गीय आणि ख्रिश्चन समाजाचे मतदारसंघ निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने उमेदवारी ठरविताना सामाजिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 12, 2025 | 04:52 PM
Daund Nagarpalika: दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘वेट अँड वॉच’; उमेदवारीवर अद्याप निर्णय नाही
Follow Us
Close
Follow Us:
  • दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
  • उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
  • महाविकास आघाडीने सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा
Daund Politics : दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असली, तरी अद्याप प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उमेदवारी भरण्याच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत भाजप, नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी, रिपाइं, पीपल्स रिप ब्लिकन पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी ‘वेट अँड वॉच’ धोरण अवलंबल्याचे चित्र आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार उमेदवारी जाहीर होण्याकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

भाजप आणि नागरिक हित संरक्षण मंडळ यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल कुल आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांनी बैठकींचा धडाका सुरू केला आहे. मात्र, अद्याप उमेदवार जाहीर न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पक्षांतर्गत बंडाळी टाळण्यासाठी निर्णय लांबविण्यात येत असल्याची चर्चा आहे.

Anjali Damania : हे म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो..; अंजली दमानिया आणणार पार्थ अजित पवारांच्या नाकी नऊ?

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी विरधवल जगदाळे करत असून, त्यांनीही अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. या गटाकडून अन्य पक्षांसोबत युती होण्याची शक्यता देखील तपासली जात असल्याचे समजते.
दरम्यान, महाविकास आघाडीने सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली, तरी त्यांनीही आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. आघाडीत अंतर्गत मतभेद उफाळल्याने, नवीन युती घडण्याची शक्यता असल्याची कुजबुज शहरात सुरू आहे.

नगराध्यक्षपद ओबीसी महिला राखीव असल्याने सर्व पक्षांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या पदासाठी मराठा–कुणबी समाजातील अनेक इच्छुकांनी भाजपा–नागरिक हित संरक्षण मंडळ आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्हींकडून उमेदवारीची मागणी केली आहे. त्यामुळे दोन्ही गटांसमोर निर्णयाचा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीकडून मात्र नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत गुप्तता पाळली जात असून, त्यावर फक्त चर्चांचा भडिमार सुरू आहे.

दिवाळीत एसटीच्या ऑनलाईन बुकिंगला पसंती; तब्बल 21.44 कोटींची झाली तिकीट विक्री

शहरातील मुस्लिम, मागासवर्गीय आणि ख्रिश्चन समाजाचे मतदारसंघ निर्णायक ठरण्याची शक्यता असल्याने उमेदवारी ठरविताना सामाजिक संतुलन राखण्याचे मोठे आव्हान सर्व पक्षांसमोर आहे. राजकीय समीकरणे अजून स्पष्ट नसली तरी आगामी काळात ‘फोडाफोडीचे राजकारण’ तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेवटी कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीतच, दौंड नगरपालिका निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होण्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसत आहेत.

 

 

Web Title: Daund nagarpalika no decision yet on candidacy in daund municipality elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Daund News
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित
1

Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे
2

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे

Ratnagiri News : शिवसेना 16 जागा तर भाजप 11 जागा…, चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगरसेवकाची दमदार ‘एन्ट्री’
3

Ratnagiri News : शिवसेना 16 जागा तर भाजप 11 जागा…, चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगरसेवकाची दमदार ‘एन्ट्री’

Maharashtra Election 2025:  EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, निवडणुकीतील गैरकारभार चव्हाट्यावर
4

Maharashtra Election 2025: EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, निवडणुकीतील गैरकारभार चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.