दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला पाच दिवस उलटले आहेत. पाचव्या दिवशी शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होऊन शासनाचे लक्ष वेधले.
भविष्यात महायुती टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जशी जबाबदारी वाढेल, तसे काम करणे गरजेचे आहे, असे आवाहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
उजनी धरणातून भीमा नदीत वीज निर्मितीद्वारे १६०० क्युसेक तर सांडव्याद्वारे १६ दरवाजे उचलून १० हजार क्युसेक एकूण ११६०० क्युसेस ने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
पुणे-दौंड दरम्यान धावणाऱ्या डेमू रेल्वेला उपनगरीय लोकल सेवेचा दर्जा मिळावा, या मागणीला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. रेल्वे बोर्डाने प्रस्ताव फेटाळून लावला आहे.
मागील तीन महिन्यांपासून उष्णतेच्या तीव्रतेने आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
खानवटे (ता. दौंड) येथील उजनी धरण पात्रात अवैध माती उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर दौंडमधील महसूल, पोलीस आणि उजनी उपसा सिंचन विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली.
अंगावर जीन्स, टी शर्ट व पाठीवर सॅक असलेल्या या तीन युवकांचा पोलिस शोध घेत आहेत. भर बाजारपेठेतील दुकाने फोडून चोरी झाल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिक धास्तावले आहेत.
जनावरांना पाना करण्यासाठी सदर औषधाचा गैरवापर होतो. इंजेक्शनमुळे जनावरे जास्त प्रमाणात दूध देतात, हे दूध मानवी आरोग्यास हानिकारक असून, त्याचे सेवन केल्याने आरोग्यावर विषारी परिणाम होतात.