Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

दौंड तालुक्यात ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र अनेक मतदार केंद्रावर दुपारपर्यंत मतदारांची गर्दी दिसून आली नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 03:10 PM
उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

उत्सुकता शिगेला! दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

Follow Us
Close
Follow Us:
  • दौंड तालुक्याचे मोजणीकडे लक्ष
  • उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
  • निकालाचा अंदाज बांधणे झाले कठीण
पाटस : दौंड तालुक्यात ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र अनेक मतदार केंद्रावर दुपारपर्यंत मतदारांची गर्दी दिसून आली नाही. मतदारांपर्यंत निरूत्साह दिसून आल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.

 

दौंड तालुक्यातील ७ जिल्हा परिषद आणि १४ पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ( दि. ७) सकाळी साडेसात वाल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सकाळपासून दुपारी दीड वाजेपर्यंत अवघे ३५. ८६ सरासरी टक्के मतदान झाले होते. तर साडेतीन वाजेपर्यंत ५०.८१ टक्के सरासरी मतदान झाले. साडेतीन ते साडेपाच वाजेपर्यंत १८ टक्क्यांनी मतदानांच्या टक्केवारीत वाढ झाली. साडे सात ते साडेपाच पर्यंत ६८.४८ टक्के मतदान झाले. मात्र, दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळाला.

पाटस जिल्हा परिषद गटात आणि मोठ्या मतदान केंद्रावर दुपारपर्यंत फारशी गर्दी नसल्याचे चित्र दिसून आले. परिणामी उमेदवारामध्ये चिंता वाढली होती. तालुक्यातील कुरकुंभ, रावणगाव, खडकी, गोपाळवाडी, मलठण,कानगाव, वरवंड या मतदान केंद्रावरील काही बुथमध्ये मतदार रांगेत उभे राहून मतदान करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र काही गावांमधील मतदान केंद्रावर अत्यंत कमी प्रमाणात मतदानाची टक्केवारी पाहायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही.

दरम्यान शनिवारी लग्नसराईची गडबड पाहायला मिळाली. वाड्या वस्तीवरील मतदारांनी आणइ उच्चशिक्षित मतदारांनीही या मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र होते. दुपारी दोन वाजताच्या नंतर काही मतदान केंद्रावर थोड्याफार प्रमाणात गर्दी दिसून आली. संध्याकाळी साडे पाच पर्यंतही मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली‌.

दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात एकुण २ लाख ७३ हजार १०० पैकी १ लाख ८७ हजार ९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये पुरुष ९९ हजार ९०० तर महिला मतदार ८७ हजार १०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण ६८.४८ टक्के मतदान झाले आहे. दरम्यान , मतदान केंद्रावर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

हे सुद्धा वाचा : महापालिका स्थायी समिती घेणार करवाढीचा निर्णय! प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावावर निर्णय नाही

अंदाज बांधणे झाले कठीण

मतदान प्रक्रियानंतर झालेल्या आकडेवारीची जुळवाजुळव करत प्रत्येक उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा व्यक्त केला आहे. दरम्यान, पाटस, वरवंड , खडकी, गोपाळवाडी गटात क्रॉस मतदान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या गटात कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याबाबत अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मात्र,पाटस , खडकी ,गोपाळवाडी , केडगाव या गटात काटे की टक्कर अशी लढत होणार आहे. दौंड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जिल्हा परिषद गटावर विजयाचा दावा केला आहे तर भाजपने ५ गटावर विजयाचा दावा केला आहे. मात्र मतमोजणी सोमवारी (दि. ९) होणार असल्याने या मत मोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Citizens of daund taluka are paying attention to the results of the zilla parishad and panchayat samiti elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Daund News
  • Election News
  • Election Result

संबंधित बातम्या

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात ‘विजय’ पर्व! उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपालांकडे केला दावा
1

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात ‘विजय’ पर्व! उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपालांकडे केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.