Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य’; बारामतीच्या निकालावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. यामध्ये अजित पवार गटाला बारामतीमध्ये अपयश मिळाले. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 07, 2024 | 02:48 PM
‘मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य’; बारामतीच्या निकालावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यापासून बारामती मतदारसंघ कायम चर्चेत होता. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई होत होती. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्यामुळे सर्वाचे लक्ष बारामतीच्या निकालाकडे लागले होते. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी १ लाखांहून अधिक मताधिक्याने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अनेकवेळी ‘मी कमी पडलो’ हे वाक्य सतत बोलून दाखवले.

मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य

पत्रकार परिषदेवेळी अजित पवार बारामतीमध्ये पराभव होण्यामागची कारणं काय? असा सवाल माध्यमांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले “आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो. बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. ते कोणत्या कारणाने पडलो, काय पडलो हे त्यांच्याशी चर्चा केल्यावर मला ते कळेल. कारण सुप्रिया निवडून आली तरी ग्रामीण भागात हवा तसा उत्साह पाहायला मिळाला नाही. चौकात गुलाल वगैरे उधलले गेले. पण आम्ही कमी पडलो”  तसंच, या मतदारसंघात भाजपाची साथ योग्यरित्या मिळाली नसल्याचीही टीका केली जातेय. त्यावर ते म्हणाले की, “ज्याने त्याने आपआपल्या परीने योग्य काम केलं. पण मीच कमी पडलो.” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

विधानसभेत त्या चुका दुरुस्त केल्या जातील

ते पुढे म्हणाले, “निकालामुळे आम्ही काही समाधानी नाहीत. मात्र जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. दिल्लीला वेळ मिळाला की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी सगळे सहकारी चर्चा करू. माझं स्वतःचं मत आहे. अपयश कशामुळे मिळालंय हे कळलंय. त्यामुळे ज्यात कमी पडलो आहे हे लक्षात घेऊन विधानसभेत त्या चुका दुरुस्त केल्या जातील. माझ्या स्वतःमुळे अपयश आल्याने मला कोणाला दोष द्यायचाच नाहीय. त्यामुळे काही दुरुस्ती करण्याची मानसिकता मी ठेवली आहे”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

Web Title: Dcm ajit pawar gives answer on baramati loksabha election supriya sule lose in press conference nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • Loksabha Elections Result 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.