Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवेंद्र फडणवीसांना चढावी लागली कोर्टाची पायरी? वाचा काय आहे प्रकरण

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 313 चा जबाब देण्यासाठी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायालयाने फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारले होते.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 30, 2025 | 04:56 PM
देवेंद्र फडणवीसांना चढावी लागली कोर्टाची पायरी? वाचा काय आहे प्रकरण
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : निवडणूक प्रतिज्ञापत्रात (Election Affidavit) खोटी माहिती (False information) दिल्याचा आरोप करत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात अ‍ॅड. सतीश उके (Satish uke) यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आपली बाजू मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले होते. यावेळी मला एकही गुन्हा मान्य नाही आणि राजकीय द्वेषापोटी माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे फडणवीसांनी न्यायालयाला सांगितले. याबाबतची माहिती फडणवीसांचे वकील उदय डबले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 313 चा जबाब देण्यासाठी नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायालयाने फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारले होते.यावेळी फडणवीस न्यायालयात म्हणाले की, यातील एकही गुन्हा मला मान्य नाही. सगळे माझ्याविरूद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजकीय वैमनस्यातून आणि राजकीय द्वेषाने प्रेरीत होऊन माझ्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे फडणवीसांनी न्यायालयात सांगितले. यासंदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीसांचे वकील उदय डबले यांनी दिली.

दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मे 2023 ला होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना साक्षी पुरावा सादर करण्यासाठी ही तारीख देण्यात आल्याची माहिती उदय डबले यांनी यावेळी दिली.

लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे कलम १२५ ए अंतर्गत उके यांनी नागपूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे याबाबत खटला दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयातही फडणवीस यांना याप्रकरणी दिलासा मिळालेला नाही. त्यांचे वकील अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांनी अ‍ॅड. सतीश उके यांची उलटतपासणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पूर्ण केली. अ‍ॅड. उके हे सध्या प्रवर्तन निदेशालय (ईडी )च्या ताब्यात असल्याने ही उलटतपासणी वारंवार लांबणीवर पडत होती. या प्रकरणाचा निकाल फडणवीस यांच्या विरोधात गेला तर त्यांना ६ महिने कारावास आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागू शकतात.

काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात 1996 आणि 1998 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल होता. या दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. परंतु 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेस अर्ज भरताना त्यांनी या दोन प्रकरणाची माहिती लपवल्याचा आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी केला. उके यांनी या प्रकरणात जेएमएफसी न्यायालयीन याचिका दाखल करून फडणवीस यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती.

Web Title: Dcm devandra fadnavis today in nagpur court lawyar adv satish uke file petition against him nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2023 | 04:30 PM

Topics:  

  • nagpur court

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.