
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha election 2024) पार्श्वभूमीवर देशभरातील विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडीची (INDIA Aghadi) स्थापना केली. मात्र निवडणूकीपूर्वीच या आघाडीचे तीन तेरा वाजले आहेत. निवडणूकीपूर्वी आघाडीमध्ये बिघाडी झाली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर आपमधील पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी देखील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली. यामुळे सत्ताधारी भाजप (BJP) विरोधकांवर सडकून टीका करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी देखील इंडिया आघाडीच्या सध्याच्या स्थितीवर खोचक टीका केली आहे.
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी फडणवीस म्हणाले, इंडिया आघाडी ही मुळात आघाडीच नाही. या आघाडीतील सर्व पक्ष आपापले गाणं गात असून समूहगाण होईल, अशी त्यांची इच्छा आहे. पण समूहगाण गाण्यासाठी कोरसमध्ये गावे लागते, तिथे एकाचवेळी सर्वांनी गाऊन चालत नाही. इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसची त्या त्या राज्यात थेट स्पर्धा आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला आपला वाटा देणार नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडी चालेल असे मला कधीही वाटले नाही, पुढेही ही आघाडी चालणार नाही” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर जहरी टीका केली.
स्टार्ट अपसाठी राज्य सरकारची खास ऑफर
मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुंबई फेस्टिवलबद्दल माहिती देताना फडणवीस यांनी स्टार्ट अप योजनांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने या फेस्टिव्हलसाठी पुढाकार घेतला. नवीन उद्योजकांसाठी आणि सर्वच क्षेत्रातील उद्योगासाठी हा एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज स्टार्टअप चॅलेंज आयोजित करण्यात आले होते. पर्यावरणातील बदलांवर परिणाम करणारे दहा शाश्वत असे स्टार्टअप निवडण्यात आले होते. त्यातील तीन स्टार्टअपला आज पोरितोषिक देण्यात आले. जे स्टार्टअप सामान्य माणासच्या जीवनात बदल करणारे असतील तर त्यांच्याशी राज्य सरकारही समन्वय साधून पुढे जाण्याची भूमिका घेईल.” अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.