CM Devendra Fadnavis: राज्यात महानगरपालिका निवडणूक लागली आहे. अनेक ठिकाणी विविध युती, आघाडी आपल्याला दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी अशा सात गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे.
पुणे महानगरसाठी विहित कालमर्यादेत 'स्ट्रक्चर प्लॅन' तयार करताना त्यामध्ये भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, नागरीकरण यांचा विचार करण्यात यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्राधिकरणाच्या ताब्यातील पुणे जिल्हा परिषदेचा सुविधा भूखंड जिल्हा परिषदेला देण्याबाबत भूखंड विकासाची व्यवहार्यता तपासून कार्यवाही करावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सध्या समाविष्ट असलेल्या उपचारांमध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण सुरू केले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले असून यात प्रत्येक जण आपल्या कल्पनांना वास्तवात आणू शकणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
Manoj Jarange Patil: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. खारघर, नवी मुंबई अशा ठिकाणी पर्याय देण्याचा सल्ला दिला आहे.
भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान येथे साजऱ्या होत असलेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोविंदा व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सबंधित अधिकाऱ्याने एक महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योग केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि राजेश पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री फडणवीस यांना मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची करण्यात आलेली तयारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाशिकमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी महायुती व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्यात विरोधकांनी महायुती बाबत फेक नेरेटिव्ह सेट केल्याने लोकसभा निवडणुकीत वेगळ चित्र होत मात्र विधानसभेला तशी परिस्थिती नाही असे मत भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले आहे.
भाजप चे कार्यकर्ते कॅप्टन विनीत मुकणे यांनी नवराष्ट्रशी चर्चा केली. पक्षविरहित राहून नेत्यांबरोबर निष्ठा ठेवली पाहिजे असे वाटत असल्याचे मुकणे यांनी यावेळी सांगितले आहे