Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3 लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा

जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 07, 2025 | 04:16 PM
Kolhapur News : 1200 गावांत पहिल्यांदा झाले ‘Deemed ANA’; जिल्ह्यातील 3  लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा
Follow Us
Close
Follow Us:
  •  3 लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा
  • 1200 गावांत पहिल्यांदा झाले Deemed ANA
  • Deemed ANA नेमकं आहे तरी काय ?
 

कोल्हापूर : जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने धडक मोहीम राबवून जिल्ह्यातील 1हजार 200 गावांमधील 60 हजार गट नंबर ‘डीम्ड एनए’ (मानीव अकृषिक) म्हणून घोषित केले आहेत. या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी कोल्हापुरात झाली असून, याचा थेट लाभ ३ लाख नागरिकांना मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 आणि 2022 च्या शासन परिपत्रकानुसार, गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटरच्या परिधीय क्षेत्रातील जमिनी अकृषिक समजल्या जाव्यात, असे निर्देश आहेत. यानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आणि भूमी अभिलेख विभागाने विशेष मोहिम राबवून रहिवासी, वाणिज्य व औद्योगिक वापरासाठीच्या जमिनींचे गट नंबर व सर्व्हे नंबर निश्चित केले.

पूर्वीच अकृषिक झालेल्या जमिनी वगळून उर्वरित 60 हजार गट नंबरच्या व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या महत्त्वपूर्ण याद्यांचे प्रस्ताव पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले उपस्थित होते.

Satara News : कर्जबुडवणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई होणार; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा इशारा

या निर्णयाची कार्यपद्धती स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता तहसील कार्यालयामार्फत संबंधित जमीनधारकांना – अकृषिक आकारणीचे चलन पाठवले जाईल. जमीनधारकाने शासनाच्या प्रचलित तरतुदींनुसार अकृषिक सारा व रूपांतरित कर जमा केल्यानंतर, तहसीलदार त्यांना – तत्काळ अकृषिक सनद प्रदान करतील. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांचा मोठा त्रास वाचणार आहे. ‘मानीव अकृषिक’ च्या – निर्णयाचे अनेक दूरगामी फायदे जनतेला होणार आहेत.

ना हरकत दाखला, अभिप्राय घेण्याची अट आता रद्द

यापूर्वी बिगरशेती परवान्यासाठी लागणारे विविध विभागांचे ना हरकत दाखले (एनओसी) आणि नगररचना विभागाचे अभिप्राय घेण्याची अट आता रद्द झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, कोणत्याही कार्यालयात अर्ज न करता त्यांना जमिनीचा अकृषिक दर्जा मिळणार आहे. जमिनी अधिकृतरीत्या अकृषिक झाल्यामुळे बैंका व वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवणे सोपे होईल, ज्यामुळे बांधकाम आणि विकासाला चालना मिळेल, याद्या अधिकृतपणे प्रकाशित झाल्यामुळे जमिनीच्या व्यवहारात पारदर्शकता येऊन फसवणुकीचे प्रकार टळतील आणि मालमत्ता पत्रिकेवर हक्क नोंदी करणे सोपे होईल.

अंमलबजावणी करणारा – राज्यातील पहिला जिल्हा

यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतलेल्या जनहितकारी निर्णयाची – प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे कोल्हापूर हे राज्यातील पहिले ठरले आहे. या निर्णयामुळे 60 हजार गट नंबर ‘डीम्ड एनए’ होत असून, आता तलाठ्यांमार्फत गावोगावी नोटीस देऊन संबंधित जमीनधारकांना अवगत केले जाईल, नागरिकांना प्रशासनाने सुलभतेने माहिती द्यावी आणि नागरिकांनीही आपली नावे तपासून पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले, पालकमंत्री म्हणून 10 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर अवघ्या काही दिवसांत प्रशासनाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त

जिल्ह्यातील 12 तालुक्यांना लाभ

हातकणंगले (62गावं ), शिरोळ (55), चंदगड (147गावे), शाहूवाडी (143गावे), करवीर (126गावे), पन्हाळा (119), राधानगरी (117), भुदरगड (116), आजरा (101). गडहिंग्लज (87), कागल (86), आणि गगनबावडा (41) या तालुक्यांतील गावांचा समावेश असून, एकूण1हजार 200गावांतील ग्रामस्थांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Kolhapur News : बिबट्याचा गावात हौदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या क्षेत्रातील जमिनी ‘डीम्ड एनए’ मानल्या जातात?

    Ans: गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटर परिघातील जमिनी शासनानुसार अकृषिक समजल्या जातात. कोल्हापुराने याच निकषांवर गट नंबर निश्चित केले.

  • Que: जमीनधारकांना काय प्रक्रिया करावी लागेल?

    Ans: तहसील कार्यालय जमीनधारकाला अकृषिक आकारणीचे चलन पाठवेल. जमीनधारकाने शासकीय नियमांनुसार अकृषिक सारा (NA Tax) रूपांतरित कर भरावा. कर भरल्यानंतर तहसीलदार जमीनधारकाला अकृषिक सनद (NA Sanad) देतात.

  • Que: NOC किंवा नगररचना अभिप्राय आता लागणार नाहीत का?

    Ans: होय. सर्व NOC आणि नगररचना विभागाचा अभिप्राय घेण्याची अट रद्द केली आहे. ही मोठी सुलभता आहे.

Web Title: Deemed ana was implemented for the first time in 1200 villages 3 lakh citizens of the district will get direct benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह
1

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘उत्तर’मधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!
2

आईच्या निखळ प्रेमाची भावना व्यक्त करणारे ‘उत्तर’मधील ‘असेन मी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस!

Indigo flights cancellation: इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द; प्रवाशांची तासन् तास  प्रतीक्षा, लांब रांगा
3

Indigo flights cancellation: इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द; प्रवाशांची तासन् तास प्रतीक्षा, लांब रांगा

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी
4

Ahilyanagar News: राहुरीत 85 वाहनांवर धडक कारवाई! 44 हजारांचा दंड वसूल करत पोलिसांची मोहीम यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.