कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपालिकेच्या निवडणूकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी शरचंद्रपवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्या विरोधात शिवसेनेनं शड्डू ठोकलायं.
माधवराव घाटगे यांनी शहरातील पिग्मी एजंट ते नामांकित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून सामान्य कुटुंबातून आलेले सुदर्शन कदम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
खराब रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील धूळ आणि लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या मांडून ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयाला सांगितले की, सामान्य माणसांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन खड्डेमय रस्त्यांमुळे होत आहे.
रोहित बोडके हे आपल्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील दत्त फौंड्री कंपनीकडे फॉर्च्युनर गाडीने चालले होते. ते कंपनीच्या जवळ आले असता अमर पाटील हे रस्त्यावर आपली दुचाकी बाजूला थांबवून फोनवर बोलत थांबले…
जिल्ह्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय पक्षांमधील जुनी वैमनस्ये, कटुता आणि आरोप-प्रत्यारोप बाजूला सारून आता नवे 'मैत्री समीकरण' उभे राहताना दिसत आहे.
अर्ज दाखल झालेल्या मध्ये गडहिंग्लज नगरपालिकेत सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे. गडहिंग्लजमध्ये सर्वाधिक २७ अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाले आहेत. तर सर्वात कमी पन्हाळा आणि मलकापूर नगरपरिषदेत आले आहेत.
जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख संजय पाटील यड्रावकर यांनी मंगळवारी दिमाखदार शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणूकीसाठी उमेदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्वच पक्षांनी मुहूत काढण्यास सुरुवात करण्याअगोदरच महायुतीत काहीसे नाराजीचे नाट्य पहावयास मिळत आहे.
पात्र लाभार्थ्यांना रेशनचा लाभमिळत नसल्याचा आरोप करीत नितेश पोवार आणि सतीश मुळीक यांनी रेशनधारकांनी पुरवठा निरिक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे असलेले अनुदान 2100 करतानाच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ होण्यासाठी अडचणीच्या ठरत असलेल्या तांत्रिक बाबी लवकरच दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र पुनर्स्थापन उपक्रमाला मोठे यश मिळाले असून, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील T20-S-2 ही 'तारा' (STR T-04) हे नवीन नाव मिळालेली तरुण वाघीण यशस्वीरीत्या सह्याद्रीत दाखल झाली आहे.
पुलाची शिरोली फाटा येथील स्वागत कमानीपासून मुख्य रस्त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौका (माळवाडी) पर्यंत मांत्रिक व त्याच्या साथीदाराची धिंड काढण्यात आली.
कोल्हापुरातील एका भागात मुलभूत मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. थेट आगामी निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
ऊसदर प्रश्नाबाबत साखर सहसंचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनास महिला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
Kolhapur welcome arch: तावडे हॉटेल चौकातील ही स्वागत कमान कोल्हापूर आल्याची सूचना देत होती. मात्र गेली दोन दशकांहून अधिक काळ असणारी स्वागत कमान जमीनदोस्त करण्यात आली.
या घटनेची माहिती शिरोलो एमआयडीसी पोलिसांना समजतात त्यांनी घटनास्थळी जाऊन दरेकर याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.