त्यांनी तातडीने ग्रामस्थांना फोन करून मदतीसाठी बोलावले. काही क्षणातच गावकरी धावत पोहोचले आणि बिबट्या कंपाऊंडमध्येच अडकला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रामस्थांनी त्याला कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती क्षणातच बदलली. बिबट्याने दातांनी तार ओढत कंपाऊंड फोडण्याचा प्रयत्न केला आणि उडी मारत प्रशांत पाटील यांच्यावर झडप घेतली. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, तर काही ग्रामस्थ किरकोळ जखमी झाले. बिबट्या कंपाऊंडची तार तोडत अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक क्षेत्रपाल राजेश नवले यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले.
वनपाल निशिकांत ठोंबरे, वनरक्षक सुनील यादव, मेघराज नवले, रमेश कदम व वनसहायक जयश्री जाधव यांनी पाहणी केली. मात्र पथक पोहोचेपर्यंत बिबट्या अंधारात अदृश्य झाला.गस्त वाढवून स्थिती नियंत्रणात आणणार प्रशांत पाटील यांच्या गोठ्यात या बिबट्याने यापूर्वीही सहा वेळा घुसून सात शेळ्या व काही कोंबड्या उचलल्याची नोंद वन विभागाकडे आहे. वनक्षेत्रपाल राजेश नवले यांनी परिसरात निमल आऊट औषधाची फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. रात्रीची गस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात ठेवणार अलसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हात देखील बिबट्याचं पिल्लू आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. साताऱ्यात देखील काही दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी आणि भोसे या परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या होत्या. वनविभागाने बिबट्याच्या संभाव्य धोक्याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये वारंवार जनजागृती केली, तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रात्रगस्त देखील सुरू केली होती. वनविभागाच्या प्रयत्नांना मोठे यशया प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे! वनविभागाने भोसे परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्रीच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं.






