loudspeakers
नागपूर : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिंदीवरील भोंगे काढण्याच्या दिलेल्या अल्टिमेटम नंतर आज सकाळपासून मनसेकड़ून राज्यात हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे. उपराजधानीतही मनसे च्या अल्टिमेटमला न जुमानता अजान झाली. यावेळी लाऊडस्पीकरवरील आवाज कमी ठेवण्यात आला होता.
शहरात 283 तर ग्रामीण भागात 108 मशिदीत आज पहाटे फजरची नमाज झालीय. पण काही मशिदीत आज भोंग्यांचा आवाज कमी होता. नागपुरातील सर्वात मोठी जामा मशीद (Jama Masjid)येथे सकाळच्या नमाजच्या वेळेस भोंग्याचा आवाज कमी होता. एकंदरित नागपुरातील जामा मशिदीसह इतर मशिदीमध्ये भोंगे कायम होते. नियमानुसार आवाज कमी करून अजान झाली. मनसेच्या अल्टिमेटमला न जुमानता अजान झाली. पहाटेच्या वेळी भोंगे वाजले. पण, आवाजाची मर्यादा पाळल्याचं दिसून आलं.
[read_also content=”राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयानं दिला निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/rana-couple-granted-bail-mumbai-sessions-court-rules-nrps-275878.html”]