Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते…”; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा

सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावळेस आम्हाला विरोधकांनी वेड्यात काढले. मात्र आम्ही तब्बल अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2024 | 03:43 PM
"आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते..."; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा

"आता केवळ ४० मिनिटांमध्ये नरीमन पॉइंट ते..."; देवेंद्र फडणवीसांची अत्यंत महत्वाची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रचाराच्या तोफा लवकरच थंडावणार आहेत. मात्र त्याआधीच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर दौऱ्यावर होते. यावेळी प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोड संदर्भात मोठी घोषणा केली आहे. नवी मुंबई आणि मुंबईमधील अंतर कमी करण्याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नरीमन पॉइंट ते विरार हा रस्ते प्रवास केवळ ४० मिनिटांध्ये होणार आहे. कोस्टल रोडचा विस्तार भाईंदर, विरार आणि पालघरपर्यंत केला जाणार आहे. त्यासाठी जपान सरकार ४० हजार कोटींचे कर्ज देणार आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरू होत आहे. त्यासाठी ४० हजार कोटींचे कर्ज मिळणार आहे. तसेच वाढवण बंदरात बंदर होत आहे. त्यामुळे या भागांचा मोठा विकास होणार आहे.”

“राज्यात नवीन रास्ते बांधले जात आहेत. या ठिकाणी विमानतळ झाल्यास या भागाचे चित्र बदलणार आहे. वाढवण बंदर झाल्यामुळे कोळी बांधव यांचा विकास होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नील क्रांति योजना आणली. त्यामुळे कोली बांधवांना कर्ज मिळू लागले. मच्छिमार बांधवांच्या आयुष्यात बदल होऊ लागले. महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. आपले सरकार आल्यानंतर १५ हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. शेती पंपासाठी बिल भरण्याची गरज भासणार नाही. त्यांचे विजबिल सरकार भरणार आहे. त्यासाठी सरकारने नवीन वीज पुरवठा कंपनी तयार केली आहे. त्याचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर बळिराजाला वर्षभर वीज मिळणार आहे.”

आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च त्यांचे मंत्रालयातील मामा करतील.  महिलांना बसमधून प्रवास करताना तिकीटामध्ये सवलत दिली. त्यामुळे नुकसानीत गेलेली एसटी फायद्यात आली. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यावळेस आम्हाला विरोधकांनी वेड्यात काढले. मात्र आम्ही तब्बल अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. मात्र हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याच्या प्रयत्नांत आहेत. ते या लाडकी बहीण योजेनेविरुद्ध कोर्टात गेले आहेत, तसेच महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनेचे पैसे आम्ही १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा: “५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात…”; फडणवीसांनी सांगितला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्लॅन

मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा प्लॅन- देवेंद्र फडणवीस

धारे बांधल्याने हा संपूर्ण परिसर पाणीदार होणार आहे. निम्न पैनगंगा धरण आहे त्या पद्धतीने बांधल्यास ९५ गावे बुडण्याची भीती होती. मी बैठक घेऊन तो निर्णय बदलला आहे. ९५ गावांना मी विस्थापित होऊ देणार नाही. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आपल्या सरकारने जे काम केले आहे, त्याची नोन इतिहासात केली जाईल. कारण गोदावरीच्या खोऱ्यात जवळपास ५० टीएमसीची तूट आहे. त्यामुळे हा मराठवाडा सातत्याने दुष्काळमुक्त भाग म्हणून केंद्र सरकारकडे व राज्य सरकारकडे त्याची नोंद आहे.  मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढील पिढीस आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. ५४ टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले तर मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळात राहील. या प्रकल्पाला हजारो कोटी रुपये लागणार आहेत. मात्र आमच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी सांगितले, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी चिंता करू नका. लागतील तेवढे पैसे देऊ. पण आपल्याला मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचे आहे

Web Title: Devendra fadanvis told coastal road plan nariman point to virar in 40 minutes in palghar election rally 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 03:43 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ
1

Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना हक्काचं घर; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, पाहा व्हिडीओ

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut
2

नारायण राणेंनी वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवलं पाहिजे – Sanjay Raut

Devendra Fadnavis : पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात राडा; फडणवीस संतापून म्हणाले, “सर्व आमदार माजलेत…”
3

Devendra Fadnavis : पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा विधिमंडळात राडा; फडणवीस संतापून म्हणाले, “सर्व आमदार माजलेत…”

“त्यांना असली शिवसेना पाहिजे की डुप्लिकेट? फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4

“त्यांना असली शिवसेना पाहिजे की डुप्लिकेट? फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.