Dhaba businessman along with the truck driver was stabbed and robbed, while three accused were arrested while two absconded
यवतमाळ : येथील धामणगाव मार्गावर चाकू हल्ला करून ट्रक चालकासह ढाबा व्यावसायिकाला चार ते पाच जणांनी लुटले. दरम्यान पोलिसांनी तात्काळ दखल घेत यातील ३ आरोपीना अटक केली तर इतर २ आरोपी फरार झाले. फरार आरोपींचे शोध पोलिसाकडून घेतला जात आहे. ही घटना २३ मे रोजी सांयकाळच्या सुमारास घडली.
गोलु उर्फ पुर्वज रमेश पारधी (२८) रा. दिघी पुनर्वसन, विक्की शरदराव बगमारे (२९) रा. यवतमाळ, दर्शन राजू ढोरे (२७) रा. यवतमाळ यांना अटक करण्यात आलेल्या तर यश राउत रा. माळीपुरा, अभिषेक ओमप्रकाश मस्के (२५) रा.यवतमाळ हे फरार आरोपींचे नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार फिर्यादी शेख फिरोज शेख मोहम्मद (४८) रा. भोसा रोड यवतमाळ हे ट्रक क्रं एम एच २९ एम ०८३३ धामणगाव रेल्वे येथून यवतमाळ कडे येत होते. दरम्यान करळगाव घाटात २३ मे २०२२ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान त्यांच्या ट्रक समोर चार ते पाच ईसम आडवे आले. फिर्यादी यांचा ब्रेक अडवून आरोपी हे फिर्यादी जवळ आले व त्यांना चाकूचा धाक दाखवून पैसे मागीतले. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी यांनी चालकाला चाकू मारुन जखमी केले. त्यानंतर फिर्यादी जवळील ४ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेवून लाथाबुक्कांणी मारहाण केली.
तसेच करळगाव घाटातील मामाचा धाब्यावर गोंधळ घालून धाबा चालकास गळयावर हातावर चाकूने मारुन गंभीर जखमी करुन जबरदस्तीने पैसे घेवून गेले व सरकारी दवाखाना यवतमाळ येथे सुध्दा आरोपी यांनी दोन हजार व एक मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत यातील तीन आरोपीना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले. फरार आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु आहे.