Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2026 | 01:52 PM
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट

Follow Us
Follow Us:

दरवर्षी हजारोंच्या संख्येने शेकडो स्थलांतरीत पक्षी दूरवरचा प्रवास पूर्ण करीत विदर्भातील जलाशयांवर विसावतात. यंदाही काही प्रजातींनी जलाशयांवर हजेरी लावली आहे. मात्र फेब्रुवारी अर्धा संपत आला असला तरी दरवर्षी लागणारी परदेशी पाहुण्यांच्या हजेरीत हवी तशी वाढ अजून झालेली नाही. केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाची ती अवस्था असून हवामान बदल, पक्षी अधिवास अन् जलाशय परिसरातील वाढता मानवी हस्तक्षेप ही त्याची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.(फोटो सौजन्य – istock)

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात देश विदेशातील पक्षी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील जलाशयांवर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या स्थलांतरीत पक्ष्यांची पक्षी निरीक्षक, अभ्यासक, छायाचित्रकार व निसर्गप्रेमी आतुरतेने प्रतीक्षा करतात. यंदा स्थलांतरणाला काहीशा उशिराने सुरुवात झाली आहे. अगदी बोटांवर मोजण्या इतक्या स्थलांतरीत पक्षी प्रजातींनी जलाशयांवर हजेरी नोंदवली. सुरुवातीला थंडी कमी पडल्याने व अजून अवधी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा पक्षीतज्ञांकडून वर्तविण्यात आली होती, मात्र तसे घडून आले नाही. आता फेब्रुवारी महिना संपत आला असला तरी फारश्या पक्षी प्रजातींची हजेरी जलाशयांवर लागलेली नाही.

अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात. यंदाही काही पक्ष्यांनी हजेरी लावली असली तरी त्यांची संख्या अन् प्रजाती या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. पेन्टेट स्टॉर्क, रेड क्रिस्टेड पोचार्ड, लेसर विसलिंग , कॉम्ब डक, ब्राम्हणी, स्पॉटबिल यासारख्या पक्ष्यांचे दर्शन या पाणथळांवर घडते आहे. तर पूर्वी फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, ग्रे हेडेड लॅपविंग, नॉदर्न शॉवलर, गडवाल, कॉमन पोचार्ड, बार हेडेड गूज यासारख्या पक्ष्यांचे दर्शन घडत होते.

कुठं फेडालं हे पाप! अस्वच्छ स्वयंपाक घर अन्…; विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, कंत्राटदाराला कोणाचे संरक्षण?

दरवर्षी शहरानजिकच्या पाणथळ स्थळी आपण स्थलांतरीत पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी भेटी देत असतो. मात्र शहरानजिकची जलाशये वाढता मानवी हस्तक्षेप अन् प्रदुषणामुळे पक्ष्यांसाठी अयोग्य ठरत आहेत. प्लास्टिकचा अवाजवी वापर, श्वानांचा वाढता हैदोस, मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आदींमुळे या जलाशयांकडे स्थलांतरीत पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. भविष्यात या पाणथळांचे संरक्षण करण्यासाठी वाढते प्रदुषण रोखणे अत्यंत गरजेचे आहे.डॉ. जयंत वडतकर,अध्यक्ष महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, असे मत व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Sporadic presence of foreign visitors in vidarbha difficulty with climate change habitat interference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Yavatmal
  • yavatmal latest news
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
1

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.