Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवमध्ये ८९.७६ कोटींचे ‘हायटेक’ न्यायभवन; सहा मजली इमारतीला मंजुरी

धाराशिव शहराच्या विकासाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार असून, शहरात अत्याधुनिक सहा मजली जिल्हा व सत्र न्यायालय इमारत उभारण्यास उच्चस्तरीय समितीने ८९ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 19, 2026 | 05:03 PM
धाराशिवमध्ये ८९.७६ कोटींचे हायटेक न्यायभवन; सहा मजली इमारतीला मंजुरी

धाराशिवमध्ये ८९.७६ कोटींचे हायटेक न्यायभवन; सहा मजली इमारतीला मंजुरी

Follow Us
Close
Follow Us:
  • धाराशिवमध्ये होणार भव्य सहामजली कोर्ट
  • १६ कोर्ट हॉल; प्रशस्त सुविधांचा असणार समावेश
  • ८९.७६ कोटींच्या खर्चाला प्रशासनाने दिली मंजुरी
Dharashiv District Court: धाराशिव शहराच्या विकासाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार असून, शहरात अत्याधुनिक सहा मजली जिल्हा व सत्र न्यायालय इमारत उभारण्यास उच्चस्तरीय समितीने ८९ कोटी ७६ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. जिल्ह्याच्या वाढत्या कामकाजाचा आणि नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जाणार असल्याची माहिती आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली उभारण्यात येणारी ही इमारत पूर्णपणे हायटेक स्वरूपाची असणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली न्यायालयाची इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कमकुवत असल्याचे निष्पन्न झाल्याने नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार जुन्या इमारतीचे पाडकाम करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा: Latur Infrastructure Development: लातूर विकास आराखड्यावर उच्चस्तरीय बैठक; पालकमंत्री भोसले म्हणाले,”मुदतीत काम न..

तळमजला अधिक सहा मजले अशा स्वरूपात उभारल्या जाणाऱ्या या न्यायभवनात एकूण १६ कोर्ट हॉल असतील. यामध्ये विशेष पोक्सो न्यायालय, लोक न्यायालय तसेच हाय सिक्युरिटी कोर्टाचा समावेश असणार आहे. पक्षकार व वकिलांसाठी ३ लिफ्ट आणि न्यायाधीशांसाठी स्वतंत्र ३ लिफ्ट अशी एकूण ६ लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही इमारत हरित संकल्पनेवर आधारित असून सौर ऊर्जा प्रकल्प व रेन वॉटर हार्वेस्टिंगची विशेष तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही यंत्रणेच्या देखरेखीखाली राहणार असून अत्याधुनिक अग्निशमन प्रणाली बसवली जाणार आहे. प्रशस्त अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, सुसज्ज फर्निचर आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअरवेलची सोयही आराखड्यात करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

मुंबई उच्च न्यायालयाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार ही इमारत साकारली जाणार आहे. मुंबई येथील मुख्य वास्तुशास्त्रज्ञांनी नकाशा व आराखड्यास मंजुरी दिली असून सुमारे १५ हजार ८२३.६१ चौरस मीटर क्षेत्रफळावर ही भव्य वास्तू उभारली जाणार आहे. नवीन न्यायालयीन संकुलामुळे वकील, पक्षकारांना सुसज्ज, सुरक्षित आणि प्रशस्त सुविधा उपलब्ध होणार असून, ही इमारत शहराचे एक महत्त्वाचे ‘लँडमार्क’ ठरेल, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला. धाराशिवच्या विकासात आणखी एक टप्पा पूर्ण होईल.

Web Title: Dharashiv cities modern district and sessions courts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Dharashiv

संबंधित बातम्या

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन
1

Dharashiv News : भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई, १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन

Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड
2

Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली
3

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.