Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यातील वाढत्या वितुष्टामुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 16, 2026 | 02:25 PM
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Follow Us
Close
Follow Us:
  • धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला
  • महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली
  • महायुतीतील एकोप्याला तडा
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर धाराशिव जिल्ह्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि शिवसेना (शिंदे)चे आमदार, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यातील वाढत्या वितुष्टामुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

पक्षीय बलाबलाचे गणित स्पष्ट, तरीही अनिश्चिततेचे सावट

बहुमतासाठी आवश्यक ‘मॅजिक फिगर’ २८ इतकी आहे. आकड्यांच्या गणितानुसार भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), अपक्ष आणि शिवसेनेतील गायकवाड गट यांची मोट बांधल्यास बहुमताचा आकडा सहज पार होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपाच्या वाट्याला जावे, यासाठी जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

शिवसेनेत दोन गट; सावंत विरुद्ध गायकवाड संघर्ष

शिवसेना (शिंदे)च्या १५ सदस्यांपैकी सुमारे ८ सदस्य आमदार तानाजी सावंत यांच्या गटाकडे, तर उर्वरित ७ सदस्य गायकवाड गटाशी निष्ठावंत असल्याचे बोलले जात आहे. सावंत गटाने भाजपापासून काहीसे अंतर राखण्याची भूमिका घेतली असल्याचे दिसते, तर गायकवाड गट भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यास उत्सुक असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. या अंतर्गत विभागणीमुळे महायुतीचे संख्याबळ कागदावर मजबूत असले तरी प्रत्यक्षात एकसंध भूमिका घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

कोकण सहलीमागील राजकीय रणनीती?

दरम्यान, संभाव्य फोडाफोडी टाळण्यासाठी भाजपाने आपल्या १९ सदस्यांसह राष्ट्रवादी, अपक्ष आणि शिवसेनेतील काही सदस्यांना कोकणात सहलीवर पाठविल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. या सहलीदरम्यान आमदार राणाजगजितसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. सदस्यांना एकत्र ठेवून बहुमत अबाधित राखण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सावंतांची व्यूहरचना; विरोधी पक्षांशी संपर्क

दुसऱ्या बाजूला आमदार तानाजी सावंत यांनी उबाठा व काँग्रेससोबत संपर्क वाढवून भाजपावर दबाव निर्माण करण्याची रणनीती आखल्याचे दिसते. आपल्या गटाचे संख्याबळ निर्णायक ठरावे आणि सत्तावाटपात अधिकाधिक पदे मिळावीत, यासाठी सावंत समर्थकांकडून भाजपावर सातत्याने आरोपांचे सत्र सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सावंत गटाला सत्तेत सामावून घेण्याचा संदेश येण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी त्याआधीच सावंत गटाने आपली ‘बर्गेनिंग पॉवर’ वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

अध्यक्षपदावरून चर्चा रंगल्या

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव लक्षात घेता अंतिम क्षणापर्यंत राजकीय घडामोडी वेगाने बदलू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. सध्या तरी आकड्यांचे गणित भाजपाच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. सावंत गटाची भूमिका आणि वरिष्ठ नेतृत्वाचा अंतिम निर्णय यावरही धाराशिव जिल्हा परिषद सत्तेचे भवितव्य अवलंबून असल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हा परिषदेत सध्याचे पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे आहे
भाजपा – १९
शिवसेना (शिंदे) – १५
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ६
उबाठा – ७
काँग्रेस – ३
अपक्ष – ४
समाजवादी – १

Kolhapur News : शासनाच्या मंजुरीनंतरही काम ठप्पच; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग होणार कधी ? संतप्त नागरिकांना एकच सवाल

Web Title: Power struggle peaks in dharashiv zilla parishad political equations shaken due to internal differences within the grand alliance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • BJP
  • Dharashiv
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

मंत्री, आमदारांकडून पक्षनिधीसाठी खासदार पार्थ पवार आग्रही; ‘पक्षनिधी द्या, अन्यथा राजीनामा…’
1

मंत्री, आमदारांकडून पक्षनिधीसाठी खासदार पार्थ पवार आग्रही; ‘पक्षनिधी द्या, अन्यथा राजीनामा…’

Dharashiv News : ‘साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम’; नवोदित साहित्य संमेलनात कैलास घाडगे पाटील यांचे प्रतिपाद
2

Dharashiv News : ‘साहित्य समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम’; नवोदित साहित्य संमेलनात कैलास घाडगे पाटील यांचे प्रतिपाद

Supriya Sule on Pune Crime: ‘पुणे महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ होतेय’;  सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर हल्ला
3

Supriya Sule on Pune Crime: ‘पुणे महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ होतेय’; सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर हल्ला

Maharashtra Politics : महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा
4

Maharashtra Politics : महा-राजकीय भूकंप! शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये; विखे पाटलांची ‘डबल स्ट्राईक’ चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.