Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 18, 2026 | 11:18 PM
Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

Dharashiv Zilla Parishad: जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ; सावंतांविरुद्ध नाराजी उघड

Follow Us
Follow Us:
  • परंडा-उमरग्याचे अपक्ष पाटलांच्या पक्षात 
  • आ. तानाजी सावंतांना बसला मोठा धक्का
  • सावंतांच्या छुप्या राजकारणावर प्रश्नचिन्ह
 

Dharashiv Zilla Parishad: धारशिव जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्षात राज्याचे माजी मंत्री आ. तानाजी सावंत यांच्या राजकारणाला त्यांच्या बालेकिल्ल्यातच जबर धक्का बसला आहे. परंडा आणि उमरगा तालुक्यातील दोन अपक्ष सदस्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या धर्माला हरताळ फासत सावंतांनी पडद्यामागून विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप त्यांच्या पक्षातीलच निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करून महायुतीच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक दावा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी केला आहे. हाफकिन आणि खेकडासारख्या वादग्रस्त विधानांमुळे जिल्ह्याची नाचक्की झाल्याचा ठपका ठेवत, सावंतांचे पुतणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीही काकांच्या नेतृत्वाला रामराम ठोकत अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. लोणी गटाच्या अपक्ष सदस्य राणी रेवनाथ ढोरे यांनी आ. सावंतांची साथ सोडून राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. उमरगा तालुक्यातील तुरोरी गटाच्या अर्चना जाधव आणि आलूर गटाचे आप्पासाहेब मल्लिनाथ पाटील यांनीही महायुतीला पाठिंबा दिला आहे.

सध्या महायुतीकडे भाजप १९, राष्ट्रवादी ६, शिवसेना (शिंदे गट) ७ आणि अपक्ष ४ असे एकूण ३६ सदस्यांचे स्पष्ट बहुमत आहे. हे सर्व सदस्य सध्या सहलीवर असून, सावंतांच्या छुप्या राजकारणाबाबतची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात सावंतांचे वर्चस्व हादरले असून राणाजगजितसिंह पाटलांची पकड अधिक मजबूत झाली आहे.

उबाठाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सुमारे दीड लाख मते मिळाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीत उबाठाच्या उमेदवारांना केवळ १५ हजार मते मिळाली आहेत. आमदार सावंतांनी त्यांची सगळी रसद लोकसभा निवडणुकीत उबाठाकडे वळवली व खासदार राजे निंबाळकर यांनी या निवडणुकीत त्यांची मते आमदार सावंतांच्या उमेदवाराकडे वळवली असल्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा असून त्यांची छुपी युती व राजकीय वस्तुस्थिती आता जनतेसमोर उघडी पडली असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ८ सदस्यांना आ. सावंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्याऐवजी स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पक्षांतर्गत शिस्तीचा भंग करणारी असल्याचेही कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकरणी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार आणि कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. महायुतीचा विश्वासघात करून विरोधकांना मदत करणाऱ्या सावंतांच्या भूमिकेची सविस्तर माहिती वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील मतदारांचा महायुतीवर असलेला विश्वास टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी आग्रही मागणीही दत्ता कुलकर्णी यांनी केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Dharashiv zilla parishad big upheaval in zilla parishad displeasure against sawant open

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 11:18 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं
1

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के
2

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
3

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Dharashiv Politics: भाजप प्रवेशासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा यू-टर्न; ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
4

Dharashiv Politics: भाजप प्रवेशासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा यू-टर्न; ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.