Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जयभीम’च्या घोषणांनी दुमदुमली रात्र; आदर्श शिंदेंच्या भीमा गीतांनी वातावरण भारावले

जयभीम’च्या घोषणांनी आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने कार्यक्रमाची रात्र रंगली. Adarsh Shinde यांच्या भीमा गीतांनी उपस्थितांना भारावून टाकले आणि क्रांतीचा संदेश दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 05:48 PM
‘जयभीम’च्या घोषणांनी दुमदुमली रात्र; आदर्श शिंदेंच्या भीमा गीतांनी वातावरण भारावले

‘जयभीम’च्या घोषणांनी दुमदुमली रात्र; आदर्श शिंदेंच्या भीमा गीतांनी वातावरण भारावले

Follow Us
Follow Us:
  • ‘जयभीम’च्या घोषणांनी दुमदुमली रात्र
  • आदर्श शिंदेंच्या भीमा गीतांनी वातावरण भारावले
  • न्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी भीमगीते
धाराशिव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात गुरुवार, १६ एप्रिल रोजी प्रख्यात गायक आदर्श शिंदे आणि त्यांच्या टीमचा भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात जल्लोषाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण केले.

आदर्श शिंदे हे आपल्या दमदार आवाजातील भीमगीतांसाठी (Bhim Geet) विशेष ओळखले जातात. त्यांच्या गाण्यांनी आंबेडकरी अनुयायांमध्ये, विशेषतः युवा पिढीत प्रचंड उत्साह आणि चैतन्य निर्माण केले आहे.

कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आलेला भव्य मंच, उत्कृष्ट ध्वनीव्यवस्था आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रम अधिकच उठावदार ठरला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी सुरुवातीपासूनच कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वातावरण भारावून टाकले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच स्तरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…

आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार आणि ओजस्वी आवाजातून सामाजिक जाणीवा जागृत करणारी, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी भीमगीते सादर केली. “जयभीम… क्रांतीचा नारा हा, जयभीम वैऱ्या इशारा हा” या गीताने उपस्थितांमध्ये उत्साहाची लाट निर्माण केली. “बाबासाहेब जिंदाबाद” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेषतः “माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं” या गीताला महिलांनी कोरसच्या माध्यमातून दिलेली साथ ही कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली. या गीतादरम्यान अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वातावरण अधिकच भावनिक आणि प्रेरणादायी बनवले.

या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील तसेच मल्हार पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे धाराशिवकरांना एक दर्जेदार आणि प्रेरणादायी सांस्कृतिक पर्व अनुभवता आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात कलाकारांचा गौरव केला. भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक समतेचा, बंधुभावाचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम धाराशिवकरांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहणार आहे.

आदर्श शिंदेंच्या भीमगीतांची वैशिष्ट्ये

आवाज आणि ऊर्जा: त्यांच्या आवाजातील ओज आणि गाण्यातील जोश तरुणांना आकर्षित करतो.
संगीत: उत्कर्ष-आदर्श या जोडीने अनेक नवीन, आधुनिक ढंगाची भीमगिते संगीतबद्ध केली आहेत.
आंबेडकरी वारसा: आनंद शिंदे आणि प्रल्हाद शिंदे यांच्यानंतर आदर्श शिंदे यांनी ही गायन परंपरा सक्षमपणे पुढे नेली आहे.
व्हिडिओ: त्यांच्या गाण्यांचे व्हिडिओ भव्य स्वरूपात बनवले जातात, ज्यात भीमाच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव असतो.

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम

Web Title: Jaybhim kranti nara adarsh shinde bhima geet event news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.