व्हायरल पोस्ट विरोधात दिपेश म्हात्रेंची तक्रार! तक्रार कॉपी वर केडीएमसीचा लोगो? डोंबिवलीत राजकारण तापलं
डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा वाद विकोपाला गेला आहे. सध्या डोंबिवलीतील राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. आज दीपेस म्हात्रे पोलीस ठाण्यात देखील गेले होते. हे सर्व प्रकरण सुरु असतानाच आता एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, दिपेश मला गणपत गायकवाड व्हायचे नाही. तसेच भाऊ मला महेश पाटील व्हायचे नाही.
हेदेखील वाचा- बॅनरबाजी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचा पदाधिकारी पोलीस ठाण्यात, नेमकं प्रकरण काय
पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. ही पाेस्ट व्हायरल झाल्यावर दीपेश म्हात्रे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे. तर दीपेश म्हात्रे यांनी तक्रारी ज्या पत्रावर केली आहे, त्यावर केडीएमसीचा लोगो आहे. त्यामुळे तक्रार कॉपी वर केडीएमसीचा लोगो कसा काय, असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे. सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असताना हा लोगो कोणी कसा वापरु शकतो, असा सवाल करत भाजपकडून दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केडीएमसी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीपूर्वी डोंबिवलीत निवडणूकी वातावरण तापू लागले आहे. इच्छूक उमेदवारांनी आपल्या परीने तयारी सुरु केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या विधानसभेचे आमदार मंत्री रविंद्र चव्हाण हे आहेत. ज्यांनी कोट्यावधीचा निधी या विधानसभा मतदार संघात आणला आहे. विकासाच्या कामावर त्यांनी ही निवडणूक लढणार असल्याचे सांगितले आहे. भली मोठी ताकद भाजपकडे आहे. मात्र विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे दीपेश म्हात्रे हे इच्छूक आहे. ही जागा भाजपकडे असल्याने म्हात्रे निवडणूक कशी लढविणार असा प्रश्न आहे. दीपेश म्हात्रे यांच्याकडून बंडखोरीची चिन्हे दिसत आहे.
हेदेखील वाचा- मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची नियुक्ती, राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं जाहीर
दीपेश म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या वाढदिवसाला खड्ड्यांचे एक बॅनर लावले. त्यानंतर हा वाद सुरु झाला. आता सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, दिपेश मला गणपत गायकवाड व्हायचे नाही. तसेच भाऊ मला महेश पाटील व्हायचे नाही. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर दीपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त अशुतोष डुंबरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
व्हायरल पोस्टद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संबंधितांवर ठोस कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. दीपेश म्हात्रे यांनी जो पत्र व्यवहार केला. त्यावर केडीएमसीचा लोगो आहे. म्हात्रे माजी स्थायी समिती होते. त्यांनी जे लेटर वापरले, त्यावर लोगो आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी शशिकांत कांबळे, नंदू परब यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली. दीपेश म्हात्रे हे केडीएमसीचा लोगो कसा काय वापरु शकतात असा सवाल उपस्थित करीत त्यांच्या विरोधात ठाेस कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.