बॅनरबाजी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचा पदाधिकारी पोलीस ठाण्यात
डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात करण्यात आलेली बॅनरबाजी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच भोवलं आहे. यानंतर डोंबिवली राजकारण चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे. पोलीस ठाण्यात दीपेश मात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दीपेश मात्रे यांना नोटीस बाजवली होती. याबाबत विचारपूस करण्यासाठी दीपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. मात्र यावेळी त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर एकच गर्दी केली होती.
हेदेखील वाचा- मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची नियुक्ती, राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं जाहीर
डोंबिवलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या 20 सप्टेंबरला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आधी डोंबिवली पश्चिमेत ठीक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवर खड्डे डे असे लिहिले होते. या बॅनरबाजी नंतर डोबिंवलीतील राजकारण चांगलचं तापलं होतं. या प्रकरणात गोंधळ निर्माण झाल्यानंतर विष्णुनगर पोलिसांनी याप्रकरणी बॅनर लावणाऱ्या आणि छापणाऱ्या जॉली प्रिंटर विरोधात गुन्हा दाखल केला. यांनतर पोलिसांनी जॉली प्रिंटर्सच्या संचालकाचा जबाब नोंदवला.
जॉली प्रिंटसच्या संचालकाने सांगितले की, त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्या सांगण्यावरून हे सर्व बॅनर लावले होते. जॉली प्रिंटसचे संचालकांनी दिलेल्या जबाबावर पोलिसांनी दीपेश म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी सर्व साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. भाजपचे पदाधिकारी संदीप माली आणि शहर प्रमुख नंदू परब यांच्यासमोर जप्त करण्यात आलेले सर्व साहित्य सील करण्यात आले. या प्रकरणाच्या पुढचा तपास विष्णूगर पोलिसांनी सुरू केला आहे.
हेदेखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन
दीपेश म्हात्रे यांना विष्णू नगर पोलिसांकडून नोटीस देण्यात आली होती. बुधवारी सकाळी शिंदे गटाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे विष्णू नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. विष्णू नगर पोलिसांनी त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केला आहे, हे जाणून घेण्यासाठी दीपेश म्हात्रे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून दीपेश म्हात्रे तिथून निघून गेले. मात्र या दरम्यान पोलीस स्टेशनच्या बाहेर यांच्या समर्थकांची एकच गर्दी केली होती.
याबाबत दीपेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे की, शहरात काही ठिकाणी खड्ड्यांचे बॅनर लावण्यात आले होते. त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच याबाबत पोलिसांनी मला नोटीस वाजवली होती. पोलिसांना मी त्या नोटीसचे उत्तर देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो. पोलिसांना जे काय उत्तर द्यायचे होते मी दिले आहे यामध्ये पोलिसांवर रोष नाही, मात्र ज्या प्रकारे या विधानसभेत दडपशाही सुरू आहे या दडपशाहीला आम्ही भिक घालत नाही, असे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं.