मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची नियुक्ती, राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केलं जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची निवड करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी पत्राद्वारे जाहीर केला. या निवडीचे पत्र पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नलावडे यांच्याकडे सुपूर्द केले. या निवडीबद्दल नलावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर यावेळी संतोष नलावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचा सत्कार केला.
हेदेखील वाचा- मातोश्री आणि उबाठा पक्षाचे रिमोट कंट्रोल दिल्लीत काँग्रेसच्या हाती– आमदार नितेश राणे
गेल्या काही वर्षांपासून संतोष नलावडे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन मनसे पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. याची दखल घेऊन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी संतोष नलावडे यांच्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यानंतर संतोष नलावडे यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव पदी नेमणूक करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदी देखील त्यांची निवड करण्यात आली होती.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतोष नलावडे यांच्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून मोठा विश्वास दाखवला आहे. एकंदरीत नलावडे हे गेल्या काही वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. या निवडीबद्दल संतोष नलावडे आनंदीत झाले असून तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. याबाबत संतोष नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष युवा नेते अमित ठाकरे आणि वरिष्ठांनी आपली उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड करून जो दाखवला आहे. तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
हेदेखील वाचा- सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या प्रयत्नांना यश, डिझेल तस्करीची केंद्र सरकारकडून दखल
मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संतोष नलावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष नलावडे गेल्या काही वर्षांपासून मनसे पक्षासोबत एकनिष्ठ आहेत. त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली असल्याचं पाहायला मिळालं. नलावडे यांची मेहनत पाहून राज ठाकरे यांनी नलावडेंची काही वर्षांपूर्वी चिपळूण तालुकाध्यक्षपदी निवड केली होती.
नवालडे यांनी चिपळूण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या संभाळली. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदाची धुरा देखील सांभाळली. नलावडे यांची ही मेहनत आणि पक्षासोबत असलेली एकनिष्ठता पाहून राज ठाकरे यांनी नलावडे यांना उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद देण्याचे जाहीर केले आहे. निवडीचे पत्र पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नलावडे यांच्याकडे सुपूर्द केले.