Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली

कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 21, 2026 | 01:40 PM
कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू

Follow Us
Follow Us:

पाटण : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली आहे. शुक्रवारपासून कोयना धरणातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ३ हजार ६०० क्युसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. यापूर्वी कोयना धरण पायथा वीज गृहातील २० मेगावॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे ४० मेगावॅट वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेक पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात येत होते.

आता सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीच्या पाण्याची मागणी वाढल्याने शुक्रवारी दुपारी २.१५ वाजता नदी विमोचकातून अतिरिक्त १ हजार ५०० व पायथा वीजगृहातून २१०० असे प्रतिसेकंद एकूण ३ हजार ६०० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणात ६२.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची पातळी २१२४ फूट १० इंच (६४७.६४९ मीटर) असून, कोयना धरणात एकूण साठा ६५.५० टीएमसी (६२.२३ %) इतका आहे.

सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्यूसेक व नदी विमोचकातून १ हजार ५०० असा एकूण विसर्ग ३ हजार ६०० क्यूसेक सुरू आहे. जून २०२६ मध्ये एकूण पर्जन्यमान कोयना – ४८७९, नवजा – ६१२१, महाबळेश्वर – ५९७३ मिलिमीटर इतके आहे. कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

वीज निर्मितीसाठी पाणी ठेवले जाते राखीव 

१ जून ते ३१ मे हे कोयना धरणातील पाणीसाठ्याचे तांत्रिक वर्ष आहे. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार ६७.५ टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी राखीव ठेवले जाते. तर उर्वरित पाणी सिंचनासाठी वापरले जाते. यावर्षी पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. पर्जन्यकाळात धरणात तब्बल १८३.५ टीएमसी पाण्याची आवक झाली.

हेदेखील वाचा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

Web Title: Discharge from koyna for irrigation has commenced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Koyna Dam
  • sangli news

संबंधित बातम्या

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज
1

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
2

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा
3

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर
4

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.