Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम महाराज पालखी सोहळा उरळी कांचन मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

  • By Aparna
Updated On: May 17, 2023 | 05:17 PM
तुकाराम महाराज पालखी सोहळा उरळी कांचन मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी
Follow Us
Close
Follow Us:

उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी 10 जून ते 28 जून यादरम्यानचा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला असून त्यामध्ये उरुळी कांचनचा दुपारचा विसावा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात न होता तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल, असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठल प्रेमी वैष्णवांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे

याबाबत बोलताना माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी सांगितले की मी सोहळा प्रमुखांची संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तू वारीत पायी चालतोस का ? तर आम्हाला पालखी सोहळा गावांमध्ये नेण्यास सांग. माझ्या पायी चालण्याचा अन पालखी सोहळ्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसताना असे वक्तव्य करत पालखी सोहळा प्रमुखांचा एक प्रकारचा उद्दाम पणा दिसून येतो, वारकरी सांप्रदायाच्या वैष्णवांचा मेळा हा गेल्या 338 वर्षांपासून देहू ते पंढरपूर असा चालवला जातो, तो मार्गस्थ होत असताना वेगवेगळ्या गावातून, वाड्या वस्त्यांतून रस्त्याने जात असतो, या मार्गातील वैष्णवाला तुकाराम महाराजांबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो, अशा या पारंपारिक धार्मिक सोहळ्याला अशा पदाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे चुकीच्या पायंड्यांना सामोरे जावे लागते आहे हे अतिशय वाईट आहे.काही ग्रामस्थांनीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांशी संपर्क करुन गेल्या सुमारे अडीचशे तीनशे वर्षांपासूनची परंपरा मोडू नये अशी विनंती केली आहे,

उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरातच घ्यावा अशी मागणी केलेली आहे, तसेच श्री काळभैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक राजाराम कांचन यांनी हवेलीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) संजय आसवले यांना फोनवरून याबाबतची कल्पना दिली व परंपरेप्रमाणे पालखी सोहळा उरुळी कांचन गावामध्ये काळभैरवनाथ मंदिरामध्ये विसाव्यासाठी थांबवण्याची मागणी केली आहे, याला अनुसरून प्रांत अधिकारी संजय आसवले यांनी शुक्रवारी उरुळी कांचन ग्रामस्थ, काळभैरवनाथ सेवा समितीचे पदाधिकारी, उरुळी कांचन देवस्थान कमिटीचे पदाधिकारी व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी यांची एक बैठक पुण्यामध्ये बोलावली आहे, या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन संजय आसवले यांनी दिले आहे

संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार असून हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत पंढरपूर येथे मुक्कामी असेल मात्र पारंपारिक पद्धतीने हा सोहळा लोणी काळभोर चा मुक्काम आटवून उरुळी कांचनच्या ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात दुपारच्या विसाव्यासाठी थांबत असतो आणि ही परंपरा पालखी सोहळा जसा हडपसर वरून एक पालखी सासवड मार्गे आणि एक पालखी लोणी काळभोर मार्गे मार्गस्थ होऊ लागल्या त्यावेळी पासून हा प्रघात… पायंडा… रुढी आहे परंतु गेल्या काही वर्षापासून देहू संस्थांनचे पालखी सोहळा प्रमुख व त्यांचे सहकारी कारण नसताना उरुळी कांचन वाशीयांना वेठीस धरून प्रत्येक वेळी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाला की उरुळी कांचनला विसाव्याला मंदिरात न जाता सोलापूर रोडवरच थांबणार, उरुळी कांचन ग्रामस्थांनी तेथेच आमची सोय करावी अशा पद्धतीची भाषा वापरून उरुळी कांचन व पंचक्रोशीतील जनतेला त्रास देण्याचे काम करीत आहेत. ग्रामस्थांनी वारंवार विनंती करून देखील त्यांच्या आडमुठेपणाच्या भूमिकेत बदल होत नाही, म्हणजेच नेमका हा पालखी सोहळा वैष्णवांचा आहे. संत तुकाराम महाराजांचा आहे का? या पाच दहा मंडळींचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Displeasure among the villagers as tukaram maharaj palkhi ceremony will not come to urali kanchan temple nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2023 | 05:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता
1

पुरंदर विमानतळ भूसंपादनाला वेग; मान्यतापत्र दोन दिवसांत मिळण्याची शक्यता

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम
2

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी
3

Metro & Rail Development: केंद्रीय मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! 19,919 कोटींच्या चार महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी

Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?
4

Pune Crime: गुंगीच औषध देवून महिलेनेच केला पुरुषावर अत्याचार! नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.