Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जसा बॉस शिकवतो तसेच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना करावे लागते; श्रीकांत शिंदे यांचा वैशाली दरेकर यांच्यावर निशाणा

  • By युवराज भगत
Updated On: Apr 12, 2024 | 10:20 PM
Dombivli Lok Sabha Constituency 2024

Dombivli Lok Sabha Constituency 2024

Follow Us
Follow Us:

Dombivli Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे आणि राजकीय प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असल्याने या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर नेहमीच आरोप करीत असतात, तर दुसरीकडे शिवसेनेतील फाटाफुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गटातील नेतेमंडळीत विस्तव काही विझायचे नाव घेत नाही. दोन्ही गट एकमेकांवर टीका करण्याची नेहमीच संधी शोधत असतात.

जसे बॉस तसे बिचारे पदाधिकारी वागतात

डोंबिवलीच्या (Dombivli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी विरोधी पक्षातील संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची मिमिक्री करीत त्यांच्यावर निशाणा साधला. याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर देताना दरेकर यांच्या आडून थेट ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नेते संजय राऊत यांच्यावर शाब्दिक वार केले. मी त्यांची चुकी मानत नाही. जसे बॉस वागतो तसे बिचारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना करावे लागते. निवडणूक झाल्यावर त्यांच्याकडे तेच काम उरेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

श्रीकांत शिंदेवर टीकास्त्र

महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ येथे प्रचारासाठी गेल्या असता, त्यांनी महायुतीचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. ज्यांना अ ब क येत नव्हते. त्यांना ते शिवसेनेने शिकवले. अ ब क काय म्हणजे काय? आपण जे काम करतोय, आपल्याकडील सध्याची परिस्थिती किंवा समाजामध्ये जे काय चाललंय याचे विचार ज्याच्या मेंदूमध्ये क्लीअर असतात, तो कधी ‘या ठिकाणी, त्या ठिकाणी’ मग असे करत नाही, असे नक्कल करून दाखविले.

आज मी अंबरनाथमध्ये आले, अंबरनाथमध्ये लोकांचे प्रश्न काय आहेत ? मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला तुम्ही इथे विचारलं ना की अंबरनाथमधील प्रश्न काय? तर तो तुम्हाला झटपट सांगेल. कारण तो रोज अंबरनाथमध्ये रस्तो रस्ते फिरतोय. जो अनुभवतो ना त्याच्या डोक्यामध्ये सगळे विषय क्लीअर असतात, असे म्हणत वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत मिमिक्री केली होती. त्यालाच श्रीकांत शिंदेंनी पलटवार करीत बोचरी टीका केली.

Web Title: Dombivli lok sabha constituency srikant shinde targets vaishali darekar they said workers and officials have to fo as the boss teaches nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2024 | 10:19 PM

Topics:  

  • Lok Sabha Election
  • Lok Sabha Election 2024
  • MP Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का?  ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज
1

Poll Tracker Mood Of India Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास एनडीएला धक्का? ‘मूड ऑफ इंडिया’ सर्व्हेचा खळबळजनक अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.