Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”; DYSP धनंजय पाटलांचा इशारा

सन २०२४ गणेशोत्सव काळात  ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात  आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 16, 2025 | 01:30 AM
Ganesh Festival: “गणेशोत्सव काळात कायद्याचे उल्लंघन केल्यास…”;  DYSP धनंजय पाटलांचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

ओतूर/ मनोहर हिंगणे: येऊ घातलेल्या गणेशोत्सव काळात सर्व गणेश मंडळानी कायद्याचे तंतोतंत  पालन करावे,सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या गावाचा व आपल्या मंडळाचा नाव लौकिक वाढवावा मात्र कोणी कायद्याचे उल्लंघन करून गैरकृत्य केल्यास कठोर पोलिस  कारवाई  केली जाईल असा इशारा दि. १३ ऑगस्ट रोजी ओतूर येथील क्रीडा संकुलन सभागृह येथे आयोजित गणेश मंडळांच्या पदाधिकारी व पोलिस  बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी दिला आहे.

 तत्पूर्वी सन २०२४ गणेशोत्सव काळात  ज्या मंडळानी आदर्श असा गणेशोत्सव साजरा केला त्या पैकी निवड समितीने प्रथम तीन क्रमांकात  आलेल्या मंडळांचा सत्कार धनंजय पाटील यांचे हस्ते करण्यात आला. त्यामध्ये
1)जय बजरंग प्रतिष्ठान पांढरीचा राजा ओतूर
2)अखील कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर
3)सार्वजनिक गणेश उत्सव मडळ हिवरे बुद्रुक  अशी या आदर्श कार्य करणाऱ्या मंडळांची नावे आहेत.
या प्रसंगी
जय बजरंग प्रतिष्ठानचे  अध्यक्ष अनिल डुंबरे, सचिव हेमंत पाटील डुंबरे,दत्तात्रय डुंबरे, कैलास बोडके,सिद्धेश तांबे,आदर्श गणेशोत्सव मंडळ निवड समितीचे परीक्षक पत्रकार बापू रसाळे,आदर्श शिक्षिका रत्ना शिरसाठ, अँड संजय शेटे,डॉ.संजय वेताळ,मंत्रालय निवृत्त अधिकारी दिलीप घोलप,  यासह   ओतूर पोलीस स्टेशनचे  ए पी आय लहू थाटे ,पो.निरीक्षक संदीप आमने, ओतूर पोलिस कर्मचारी ,ज्येष्ठ नेते  विनायक तांबे, शेतकरी नेते अंबादास हांडे,उपसरपंच प्रशांत डुंबरे, गावोगावचे पोलिस पाटील,विविध मंडळांचे पदाधिकारी ओतूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी २०२५ च्या गणेशोत्सव काळात मंडळानी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी कायदेशीर  नियमावली जाहीर केली ती पुढील प्रमाणे -1)रजिस्टर नसलेल्या गणपती मंडळांनी धर्मदाय आयुक्त यांचे कडुन तात्पुरता परवाना घेणे जरूरीचे आहे.

2)पोलीस विभाग ,नगरपालीका /ग्रामपंचायत ,महावितरण ,यांची परवानगी प्राप्त करावी .
3)दिवसा व रात्रीचे वेळी मुर्तीचे संरक्षण तसेच मुर्तीचे दागिन्यांचे संरक्षण या करीता आपले मंडळाचे वतीने स्वयंसेवक सुरक्षा रक्षक नेमणे,त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या मंडळाची असेल.
4) मंडपामध्ये किंवा गणपतीचे मुर्तीचे ठिकाणी करण्यात येणारी वीज जोडणी/करण्यात येणारी विद्युत रोषणाई  सुरक्षित असले बाबत       एम.एस.ई.बी.कार्यालयातील संबधित कर्मचा-यांकडून तपासणी मंडळानी तसे प्रमाणपत्र घ्यावे.
5) प्रत्येक मंडळाने आपले अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारी यांचे संपूर्ण,नाव, पत्ता, मोबाईल नंबरची यादी मंडळा समोर दर्शनी भागात लावावी.
6) गणपतीच्या मुर्तीच्या संरक्षणाकरिता 24 तास स्वयंसेवक नेमावेत.
7) गणेश मंडपात आग प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.CCTV कॅमेरे लावावे.
08) मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनीक्षेपकावर दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे. लेझर लाईट चा वापर कोणीही करू नये असे निदर्षनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.
09) महिला आणि लहान मुलांकरिता स्वतंत्र रांगा करावेत व छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी.
10) गणेशोत्सवात दर्शविण्यात येणारे देखावे/चित्रे हे चिथावणारे अथवा जातीयवादी नसावेत.
11)  मिरवणूक जास्त वेळ एका ठिकाणी रेंगाळत ठेवू नये. वाद निर्माण होतील असे  गीत  वाजवू नयेत. नशा पाणी करून कोणीही मिरवणुकीत सामील होऊ नये.
12)जाणीवपुर्वक, खोडसळपणे मिरवणूकीत घुसण्याचा प्रयत्न करणायांवर मंडळाचे अध्यक्ष  व सभासद यांनी सदर इसमाशी वाद न घालता सदर इसमास तात्काळ पोलीसांकडे सुपूर्त करावे.
13)जात ,धर्म ,पंथ,व्यक्ती ,समाज यांच्या भावना दुखवतील /ठेच पोहचेल असे फ्लेक्स देखावे ,कृत्य, नृत्य संगीत होणार नाहीत याची दक्षता खबरदारी घ्यावी अन्यथा कायदेशीर  कारवाई करण्यात येईल. या प्रकारच्या सूचना यावेळी देण्यात आल्या, रत्ना शिरसाठ, बापू रसाळे, विनायक तांबे यांनी उपस्थितांना संबोधित करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

Web Title: Dysp dhananjay patil warn all ganesh mandal follow the law and order in ganesh festival otur junnar pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:30 AM

Topics:  

  • Ganesh Festival
  • junnar news
  • Law And Order

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.