varsha gaikwad
मुंबई : शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी (School out Student) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा त्यांना शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारने (state government) पुढाकार घेतला आहे. यासाठी शिक्षण विभागाने नवीन (education department) मोहिम सुरु करण्यात आली आहे. राज्यात 5 जुलैपासून झीरो ड्रॉप आऊट (Zero drop out) सुरु करण्यात येणार आहे. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित बालकांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी ही शोधमोहीम राबविली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. 5 जुलैपासून 15 दिवस म्हणजेच 20 जुलैपर्यंत (5 Jult to 20 July) ही मोहीम राबविली जाणार असून याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध स्तरावर समित्या नेमण्यात येणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.
[read_also content=”पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ https://www.navarashtra.com/latest-news/the-number-of-corona-patients-in-pimpri-chinchwad-city-has-increased-again-nrab-296429.html”]
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे हे या मोहिमेसमोरील उद्दिष्ट आहे. कोरोनामुळे राज्यातील अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले असून 3 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य बालकांना यो मोहिमेद्वारे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येणार आहे. बालकांच्या सर्वेक्षणात 100 टक्के बालके शाळेत दाखल झाली नाहीत तसेच काही बालके मधूनच शाळा सोडत असल्याचे समोर आले. आता या विद्यार्थ्यांचा पुन्हा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे यावर या मोहिमेचा भर आहे.
मिशन ड्रॉपआऊट कुठे होणार?
घरोघरी, रेल्वे स्थानक बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्टय़ा, दगडखाणी, साखर कारखाने, बालमजूर, स्थलांतरित कुटुंबे आदी ठिकाणी होणार आहे. तसेच मिशन झीरो ड्रॉपआऊटची कार्यपद्धती ही जन्म, मृत्यू अभिलेखामधील नोंदीचा वापर, कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतर झालेल्या कुटुंबांची भेट, 18 वर्षांपर्यंतच्या दिव्यांग बालकांचाही यात समावेश करण्यात येणार आहे.