
अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; 28 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्जास होणार सुरुवात
अहिल्यानगर : आशिया खंडातील अग्रगण्य आणि सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था मानल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या २८ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, २ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान पार आहे. त्यामुळे यंदाच्या सणासुदीच्या दिवसांत जिल्ह्यात राजकीय फटाके फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा बँकेच्या या सत्तासंघर्षासाठी विविध तालुक्यांतील विकास संस्था मतदारसंघातून प्रमुख नेते व संचालकपदासाठी इच्छुक मोर्चेबांधणी चालविली आहे. अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरची मुदत असून २ नोव्हेंबर रोजी मतदान आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच ३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन बँकेची नवीन सत्ता कुणाच्या हाती जाणार याचा फैसला होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात काही भागांत दुष्काळी परिस्थितीचे सावट असल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी शेतकरी व स्थानिक पातळीवरून पुढे येत आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी अद्याप याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जर निवडणूक बिनविरोध झाली, तर सत्ताधारी महायुतीमधून कोणाची लॉटरी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम…
– २८ सप्टेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करणे
– २१ ऑक्टोबर माघारीसाठी अंतिम मुदत
– २३ ऑक्टोबर चिन्ह वाटप
– २ नोव्हेंबर मतदान
– ३ नोव्हेंबर मतमोजणी व निकाल
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या हालचाली वाढल्या
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र पॅनेल उभारायचे की महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, याबाबत महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या समन्वयाची जबाबदारी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.