सांगलीत किरकोळ वादातून झालेल्या चापटीचा राग मनात धरून 18 वर्षीय चेतन तांदळे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी सुजल वाघमोडेसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Political News: राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी सांगलीत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपची अवस्था 'पिंजरा'मधील मास्तरासारखी झाली असून सत्तेसाठी ते कोणाशीही युती करत असल्याची टीका त्यांनी केली.
सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हिंदुत्ववादी नेते आक्रमक झाले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपकडे धारकऱ्यांसाठी काही जागांची मागणी केल्याची माहिती समोर येत होती.
भाजपमध्ये सध्या निवडणुकीतील उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे आणि अनेक स्थानिक नेत्यांनी ही जागा मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचे दिसून येत आहे. सांगलीचे शिष्टमंडळ पुन्हा मुंबईत
सांगलीमध्ये आता महापालिका निवडणुकीचा संग्राम आणि रणधुमाळी सुरू झाली आहे. आता इथे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पॅनेल पुढे येणार असल्याची माहिती समोर येत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Maharashtra Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे.१२ माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.
शहरातून राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा डीपीआर तयार करत आहोत. सांगलीवाडीतून कोल्हापूररोडला जोडणारा रिंगरोड तयार करणार आहोत, असे आयुक्त सत्यम गांधी म्हणाले.
आम्ही महायुती करण्यास प्राधान्य देऊ, मात्र चर्चेअंती युती न झाल्यास आम्ही ताकदीने निवडणूक लाढण्यासाठी तयारी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्ययाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे यांनी दिली.
सांगलीत दलित महासंघाचे मोहिते गटाध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवसाच्या दिवशीच रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख याने निर्घृण हत्या केली. संतप्त जमावाने आरोपीला बेदम मारहाण केली असून पोलीस तपास सुरू आहे.
सांगलीतील तबेल्यात शिवीगाळीच्या रागातून दोन मित्रांनी अमीर कन्नुरेचा निघृण खून केला. दारूच्या नशेत झालेल्या वादाचं रूपांतर हत्या झाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे.
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. शासकीय कामात अडथळा आणत पथकातील अधिकाऱ्यांवर धक्काबुक्की, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली आहे.
सांगलीतील इस्लामपूर येथे २५ वर्षीय नवविवाहित अमृताने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. सासरकडून माहेरहून २ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला जात होता. पाच जणांवर गुन्हा दाखल.
वाळवा तालुका शांत आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्हात अशांतता निर्माण केली असून या मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे सुष्मिता जाधव म्हणाल्या.
राज्य शासनाच्या आजपर्यंतच्या कामकाजात सांगली जिल्ह्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, जिल्हयाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करू असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हटले.
सांगलीच्या मनेराजुरी गावात शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी मोजणी बंद पाडली.