Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीम शर्मांच्या पत्नीला या पक्षाने दिली विधान परिषदेची ऑफर; अंधेरी पूर्वमधून उमेदवारी घेतली मागे

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी अंधेरी पूर्वमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना एकनाथ शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यांनी आज अर्ज मागे घेतला.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 04, 2024 | 09:18 PM
एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी आज उमेदवारी अर्जमागे घेतला

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी आज उमेदवारी अर्जमागे घेतला

Follow Us
Close
Follow Us:

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांनी मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवसेना एकनाथ शिंदे गटातून त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी देणार असल्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे अर्ज माघार घेतल्याचं स्वीकृती शर्मा यांनी सांगितलं.

#WATCH | #MaharashtraElection2024 | Mumbai: Former Encounter specialist Pradeep Sharma’s wife, Swikriti Sharma withdraws her nomination as an independent candidate She says, “I would like to thank Shinde sir. For the last 10 years, we have been in social service. We got an… https://t.co/3KU85QJRfh pic.twitter.com/mjiIaQHfXQ — ANI (@ANI) November 4, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानते. गेल्या १० वर्षांपासून आम्ही आम्ही समाजसेवेत आहोत. एका मोठ्या क्षेत्रात काम करण्याची संधी हवी होती. त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र एकनाथ शिंदे यांनी मला विधान परिषदेचं आश्वासन दिलं आहे. ती सुद्धा माझ्यासाठी मोठी संधी असल्याचं स्वीकृती शर्मा म्हणाल्या आहेत.

२६ ऑक्टोबर रोजी स्वीकृती शर्मा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अंधेरी पूर्व मतदारसंघातून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आता भाजपचे मुरजी पटेल आणि ठाकरे गटाचे तृप्ती देसाई यांच्या लढत होणार आहे.

हेही वाचा-Mahim Constituency Politics: सदा सरवणकरांनी घेतला निर्णय; माहीममध्ये तिरंगी लढत अटळ

राजकारण नेहमी ठरल्याप्रमाणे होत नाही, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यावर लोक माझ्या पत्नीला पाठिंबा देतील, असा मला विश्वास आहे. आम्हाला तिकीट न मिळण्याची कारणे असू शकतात, परंतु आम्ही अपक्ष म्हणून उभे आहोत, असं शर्मा यांनी म्हटलं होतं. राजकारणात कधीच गुंतलो नाही आणि भविष्यातही राजकारण करण्याची योजना नाही. जनतेची सेवा करण्यावर आमचा भर आहे. आम्ही कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षावर नाराज नाही, पण निवडलेल्या उमेदवारामुळे आम्ही निराश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपल्याला विधान परिषदेची संधी दिली जाणार, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत स्वीकृती शर्मा

स्वीकृती शर्मा या प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत. प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या 13 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह 11 नोव्हेंबर 2006 ला अंधेरीतील सात बंगला येथे नकली चकमक घडवून आणली होती,  असा आरोप करण्यात आला होता. यात लखनभैयाचा एन्काउंटर झाल्याचा बनाव करण्यात आला होता. या प्रकरणी लखनभैयाचे वकील रामप्रसाद गुप्ता यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी सातत्याने कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टाने या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं. पण कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं.

Web Title: Encounter specialist pradeep sharma wife swikriti sharma takes back nomination in maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 07:09 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elections 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.