Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी, मुंब्र्यातील शाखेवरून उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

  • By युवराज भगत
Updated On: Nov 11, 2023 | 07:56 PM
uddhav-thackeray-attacks-eknath-shinde-says-shiv-sena-is-one-i-dont-accept-other-sena

uddhav-thackeray-attacks-eknath-shinde-says-shiv-sena-is-one-i-dont-accept-other-sena

Follow Us
Close
Follow Us:
ठाणे : मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. शिंदे गटाने मुंब्र्यातील शाखा पाडल्यानंतर त्याठिकाणी तात्पुरती नवीन कंटेनर शाखा उभारली आहे. या घडामोडीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी तिथे शिंदे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे दोन्ही गटाच मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बॅरिकेड्सजवळून घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाषण करत शिंदे गटाला इशारा दिला आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “या खोके सरकारने आमची शाखा पाडून तिकडे एक खोका (कंटेनर शाखा) अडवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचला नाहीतर, आम्ही तो खोका उचलून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही. या शाखेची सगळी कागदपत्रे आमच्याकडे आहेत.”
“अरे नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलीस बाजुला ठेवा आणि समोर या… दिल्लीच्या कृपेनं आज तुम्ही सत्तेत बसला आहात. कठपुतली आणि बाहुल्यांनो.. तुमच्यात हिंमत नाही. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजुला ठेवा आणि आम्हाला भिडा. आमची तयारी आहे. तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने मी तिकडे जाऊन उभा राहिलो. बघू कुणाच्यात किती हिंमत आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी यांचे (शिंदे गट) सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली. ही शाखा गुंडगिरी करत शिंदे गटाकडून बळकावली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. तर या ठिकाणी शाखेची नव्याने उभारणी केली जात असल्याचा दावा शिंदे गटाने केला. त्याचे भूमिपूजनही पार पडले आहे.

Web Title: Even if my hair gets a shock uddhav thackerays warning to shinde group from a branch in mumbra nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2023 | 07:56 PM

Topics:  

  • Shinde group
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

Bharat Gogawale Aghori Pooja : मंत्री भरत गोगावले यांनी केली अघोरी पूजा? रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी वेगळाच मार्ग?
1

Bharat Gogawale Aghori Pooja : मंत्री भरत गोगावले यांनी केली अघोरी पूजा? रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी वेगळाच मार्ग?

RAVI PATIL : विविध विषयांवर शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील काय म्हणाले?
2

RAVI PATIL : विविध विषयांवर शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील काय म्हणाले?

ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Kolhapur Politics फडणवीसांचा ‘तो’ कोल्हापूर दौरा यशस्वी; ठाकरेंचे दोन बडे शिलेदार भाजपच्या गळाला
4

Kolhapur Politics फडणवीसांचा ‘तो’ कोल्हापूर दौरा यशस्वी; ठाकरेंचे दोन बडे शिलेदार भाजपच्या गळाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.