Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री छगन भुजबळांचा मोठा दावा, रोहित पवारांसह सगळेजण मंत्रिमंडळात जायला तयार होते, सगळ्यांच्या पत्रावर सह्या

Chhagan Bhujbal On Rohit Pawar : राष्ट्रवादीमधील एक गट अजित पवारांसह (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोठा दावा केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या आमदारांना ब्लॅकमेल करण्याच्या आरोपांना मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार शब्दांत उत्तर दिले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 23, 2023 | 02:58 PM
chhagan bhujbal

chhagan bhujbal

Follow Us
Close
Follow Us:
नाशिक : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आता अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रोहित पवार यांनी अजित पवार गटाला चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रोहित पवारांनी आमच्या आमदारांना अजित पवार गटाकडून ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. आता यावर छगन भुजबळ यांनी यावर गंभीर आरोप केला आहे.
छगन भुजबळ यांचा दावा
अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप असल्याचे वक्तव्यदेखील छगन भुजबळ यांनी केले आहे.

राष्ट्रवादीमधील संघर्ष चव्हाट्यावर

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील (Maharashtra NCP) संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्यासह इतर आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर अनेक घडामोडी समोर आल्या. मात्र गेल्या काही दिवसात रोहित पवार आणि अजित गटातील नेत्यांचा संघर्ष टोकाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे एक आमदार आणि खासदार अजित पवार गटात जाण्याबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. काही नेत्यांचा ब्लॅकमेलिंग सुरू आहे तू सही कर नाहीतर काम होणार नाही, असं कदाचित सांगितलं जात असा आरोप रोहित पवार यांनी केला. यावर भुजबळ यांनी रोहित पवार यांचा समाचार घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला आहे.

विजय वड्डेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर

तसेच विजय वड्डेट्टीवर (Vijay Vadettiwar) यांच्या टीकेला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षाकडून टीका सुरू आहे, ते त्यांचे काम करीत आहेत. ते सगळे बोलणारच, विरोधी पक्षात असल्यावर ते काय करू शकतात? असे भुजबळ म्हणाले. तर राष्ट्रवादी पक्षाचे सुनावणीवर भुजबळ म्हणाले की, पवार साहेब म्हणाले होते, कायदेशीर लढाई लढणार नाही. पण नोटीसा द्यायचे काम झाले आहे. बघू काय होते ते? असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी (Nashik Onion Issue) पुकारलेल्या संपाबाबत छगन भुजबळ म्हणाले की, कांदा व्यपाऱ्यांचे काही प्रश्न भारत सरकारशी निगडित असून काही प्रश्न राज्य सरकारशी निगडित आहेत. वाणिज्य मंत्री पियूष गोयल ही मंडळी लोकसभा अधिवेशनात गुंतलेली आहे. सद्यस्थितीत कांदा प्रश्न हा अडचणीचा भाग झाला असून मुख्यमंत्री यांच्या कानावर घातलं आहे. लवकरच काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.

तर आमदार सुनील शेळके म्हणाले

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी आमदार रोहित पवारांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवारांची जागा घेऊ पाहतायेत, असा गौप्यस्फोट अजित पवारांचे कट्टर आणि मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केला. अजित दादांचं स्थान कुणीतरी घेऊ पाहिलं तर ते होणं शक्य नाही. रोहित पवार यांनी स्वतःची ओळख निर्माण करावी, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावे. रोहित पवार स्वतःचे विचार मांडतात. रोहित पवारांना वेळी स्पेस मिळावी, रोहित पवारांना स्वतःचा कुठेतरी स्थान निर्माण व्हावं त्याकरता त्यांचा खटाटोप सुरू असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वक्तव्य केले आहे.

रोहित पवार काय म्हणाले होते?

एखादे महत्वाचे काम तोपर्यंत आम्ही करणार नाही, जोपर्यंत तुम्ही सही करत नाही, अशा काही घटना घडत असल्याचे आम्हाला कळतंय. मग अशा पद्धतीने जर ब्लॅकमेल करून जर नेत्यांना धमकावणे चुकीचे आहे. शेवटी आमदाराला काय पाहिजे असतं तर त्याच्या मतदार संघामध्ये एखादा विषय मार्गी लावण्यासाठी निधीची गरज असते. मग एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न असो, कष्टकऱ्यांचा असो, किंवा युवांचा अडकलेला प्रश्न असो. तो प्रश्न सुटावा यासाठी प्रामाणिक पद्धतीने प्रयत्न करत असतात, ‘मग तू सही कर, नाहीतर हे काम होणार नाही, असे कदाचित काही नेते सांगतात, असं कळतंय. अशा पद्धतीने आज कदाचित तो आकडा तुमच्या बाजूने दिसेल, जेव्हा इलेक्शन जवळ येईल, तेव्हा त्यांना कळलं की खरेच किती लोक त्यांच्याबरोबर आहेत, असं रोहित पवार म्हणाले आहे

Web Title: Everyone including rohit pawar was ready to join the cabinet signatures on everyones letter minister chhagan bhujbals big claim nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2023 | 02:41 PM

Topics:  

  • Minister Chhagan Bhujbal
  • rohit pawar

संबंधित बातम्या

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले
1

काशीनाथ चौधरी कोण आहेत? पालघर साधू हत्या प्रकरणाशी काय संबंध ? भाजपने २४ तासांत पक्षातून काढून टाकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.