Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : अजितदादांना मुद्दामून सहीसाठी थांबवून ठेवण्यात आला अन् विमान प्रवास; रोहित पवारांचा मोठा संशय

आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी 27 आणि 28 तारखांचा घटनाक्रम सांगितला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 03:27 PM
Rohit Pawar Press Conference on ajit pawar accident

Rohit Pawar Press Conference on ajit pawar accident

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवार यांची पत्रकार परिषद
  • अजित पवार यांच्या विमान अपघातावर व्यक्त केला संशय
  • प्रमोदराव हिंदूराव यांच्या वक्तव्याचा हवाला
Rohit Pawar Press Conference : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांचे 28 फेब्रुवारी रोजी बारामती विमान अपघातामध्ये निधन झाले आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यानंतर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या घटनेची सखोल आणि चौफेर चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजित पवारांचा अपघातापूर्वीचा घटनाक्रम सांगितला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार यांचा विमान प्रवास हा अचानक ठरवला गेला. जर 27 जानेवारी 2026 रोजी अजितदादा पुण्याला कारने गेले असते तर पुण्याला पोहचले आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला गेले असते. तर मग ही दुर्दैवी घटना घडली नसती. 27 तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यावर मी अगोदर बोललो आहे. बैठकीला उशीर झाला. त्यानंतर कुणाचा फोन आला हे लोकांना आता कळालं आहे,” असे म्हणत रोहित पवार यांनी प्रमोदराव हिंदूराव यांच्या वक्तव्याचा हवाला दिला आहे.

हे देखील वाचा : उन्हाळ्यात भासणार १०७५ गावांना टंचाई, पाण्यासाठी टँकरवरच राहणार भर

पुढे ते म्हणाले की, “फाईलवर मुद्दामून स्वाक्षरी झाली पाहिजे अशी एका नेत्याने इच्छा व्यक्त केली. दादांनी ती स्वाक्षरी केली आणि संध्याकाळी 7.13 वाजता, विमानाचं बुकिंग झालं. जर दादांचं विमानाने जाण्याचा प्लॅन झाला असता तर 26 तारखेला संध्याकाळी अथवा 27 तारखेलाच दुपारी विमानाचं बुकिंग झालं असतं. जी काही क्रमवारी ती मी बोलून दाखवली. मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “27 तारेखापासून ते 28 तारखेपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे. तर जे प्रमुख पायलट होते. ते कुणाला भेटले. महिनाभर आणि दोन महिन्याभर कुणाच्या संपर्कात होते, कुणाला भेटले होते याची सु्द्धा चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

हे देखील वाचा : मोठी बातमी ! पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्या 69 कार्यकर्त्यांवर भाजपकडून कारवाई; थेट सहा वर्षांसाठी…

रोहित पवार यांनी काही शंका बोलून दाखवल्या आहेत. “प्रमोदराव हिंदूराव यांनी जी माहिती दिली, याचा अर्थ मी कुठंही खोटं बोललो नाही हे समोर येत आहे. जसं की 27 तारखेला तटकरे यांनी स्वतः सांगितले की तिथं स्वतः आलो, उशीरापर्यंत थांबलो. दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल यांचा फोन आला असे हिंदूराव सांगत आहेत. आणि मग उशीरा झाला. याचा अर्थ दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे. एका पॉलिटिकल कन्स्लटन्शीबाबत तिथं चर्चा झाली. योगायोग असा आहे की या पॉलिटिकल कन्स्टलन्शीने विमान सुद्धा विकत घेतलं आहे. आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटींचा कॉन्ट्रक्ट कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका होती. कदाचित त्यामुळे वाद विवाद झाला. सुनील तटकरे हे त्यावेळी तिथं होते. त्यामुळे दादांना उशीर झाला. उशीर झाला म्हणून दादा गाडीने जाण्याऐवजी विमानाने गेले,” असा घटनाक्रम रोहित पवारांनी सांगितला आहे.

Web Title: Rohit pawar press conference on ajit pawar accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या;  रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
2

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल
3

‘उद्योगांबाबत फक्त दावे नको, आकडे जाहीर करा’; रोहित पवारांचा सरकारला सवाल

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
4

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.