राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची उद्यापासून बोर्डाची परीक्षा; परीक्षेचा पॅटर्न सोपा, उत्तीर्णांची संख्या वाढणार?
मुंबई : महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील विद्यापीठे आणि महाविद्यालांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्यासाठी आवश्यक असलेल्या राज्य पात्रता परीक्षेची (सेट) तारीख जाहीर झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे या दोन्ही राज्यांमध्ये घेतली जाणारी परीक्षा 4 मे रोजी होणार आहे. याबाबत विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे माहिती जाहीर केली आहे.
हेदेखील वाचा : HSSC मध्ये ‘या’ अंतर्गत मिळणारे 5 गुण होणार बंद; हायकोर्टाच्या आदेशानंतर हरयाणा सरकारचा मोठा निर्णय; पहा सविस्तर
राज्यातील सहाय्यक प्राध्यापकपदावर नियुक्तीसाठी राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. मुंबई आणि गोवा या राज्यांमध्ये ही परीक्षा घेण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही नोडल एजन्सी म्हणून जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचवल्याप्रमाणे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही परीक्षा कशी घ्यावी, याबाबत चर्चेनंतर आता यूजीसीच्या सूचनेप्रमाणेच आतापर्यंत झालेल्या परीक्षांप्रमाणेच ही परीक्षाही पारंपरिक पद्धतीने घेण्याचे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्र व गोव्यातील विद्यार्थ्यांनाही संधी
ही परीक्षा यंदा ४ मे रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. परीक्षेसंदर्भातील सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम, आणि इतर माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन तारखा नोंदवून घ्याव्या, असे विद्यापीठाने सांगितले आहे.
दरम्यान, ही परीक्षा संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांसोबतच गोव्यातील विद्यार्थ्यांसाठीही होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीने अभ्यासाला लागावे. अर्जाच्या तारखेकडे लक्ष ठेवून विहीत मुदतीत अर्ज दाखल करावा, अशा सूचनाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.
हेदेखील वाचा : बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न आहे? ‘या’ परीक्षांची सुरु करा तयारी; आयुष्यभरासाठी व्हाल मालामाल