Exciting burglary in two villages in one night in Umarkhed! Mudemal Lampas of Rs
उमरखेड : तालुक्यातील ढाणकी परिसरातील (Dhanki area) सावळेश्वर व करंजी (Savleshwar and Karanji) येथे एकाच रात्री चोरट्यांनी घरपोडी करून सोन्याच्या ऐवजासह रोकड लंपास (Cash lamps with gold substitutes ) करून कुटूंबीयांना बेदम मारहाण (Family members beaten to death ) करून पोबारा केला. करंजी येथे २५ हजार रुपयांचे दागिने तर सावळेश्वर येथील दोन घरातून तब्बल सव्वा दोन लाखाचे दागिने व रोकड लंपास केली. ही घटना ३ जुलै २०२२ रोजी रात्री घडली.
चोरीच्या कचाट्यात सापडलेल्या कुटुंबियाकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री चोरी करण्याच्या उद्देशाने करंजी येथील रहिवासी पंडित कलाने यांच्या घरात सात चोरट्यांनी घराचे दार तोडून चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. घरातील चोरट्यांच्या हालचालीची चाहूल पंडित यांची पत्नी पूजा हिला लागताच तिने आपल्या रूममध्ये झोपून असलेल्या पतीला चोरटे घरात घुसल्याची कल्पना दिली. व आपल्या खोलीचे घराचे दार दरवाजा घट्ट बंद करण्याच्या तयारीत असतानाच चोरट्यानी जोर लावून तो दरवाजा उघडला. याच दरम्यांन झोपलेला पती पंडित आवाजाने जागे झाले.
दरम्यान पती पंडित व पूजा व आणी चोरट्यात जोरदार झटापट सुरू झाली. चार चोरट्यांच्या गोटमारीचा मुकाबला करताना पती पंडित जखमी अवस्थेतही त्यांच्याशी दोन हात करुन झुंज देत होता तर पूजा तीन चोरट्याचा प्रतिकार करत बाजूच्या खोलीत झोपलेल्या सासऱ्याच्या रूमची बाहेरून बंद असलेली कडी उघडण्यासाठी धडपडत होती. एवढ्यात ३२ वर्षाची विवाहित पूजा तीन चोरट्याचा प्रतिकार करत चोरट्यांशी झटपट करत असताना चोरट्यांची गोटमार सुरू होता. सासरा गणेशराव कलाने मदतीला धावताच काही कळायच्या आत चोरांनी त्यांच्यावर दगडाचा मारा सुरू केला. चोराच्या तावडीतून स्वतःची सुटका झाल्याच्या संधीचा फायदा घेत पूजाने हातात काठी घेऊन घराचे टिन पत्रे आत मधून वाजवायला सुरुवात केली. आरडा ओरड सुरू केली. अशात चोरांनी आता आपण पकडले जाऊ शकतो या भीतीपोटी पंडित कलानेच्या डोक्यात जबरदस्त वार करत त्यांना गंभीर जखमी केले. पूजाच्या गळ्यातील अंदाजे पाच ग्रॅमची सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली.
त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सावळेश्वर गावाकडे वळविला तेथे नागोराव नारायण रावते यांच्या किराणा दुकानाचे लोखंडी शटर वाकून दुकानातील २० हजार रुपये नगदी रोकड वर हात मारला त्यानंतर दुकानाला लागूनच असलेल्या खोलीत त्यांची आई जिजाबाई नारायण रावते (६५) ह्या झोपेत असताना तिला जागे करून तिच्या गळ्याला चाकू लावून अंगावरील दागदागिने लुटले. एवढेच नव्हे तर खोलीत असलेल्या बंद कपाटाच्या चाव्यांची मागणी केली, माझ्याकडे नाहीत असे म्हाताऱ्या आईने सांगतात गजाच्या साह्याने त्यांनी कपाट तोडून त्यामध्ये असलेले लहान मुलांचे दागिने चोरले
दरम्यानच्या काळात चोरांच्या हालचाली आणि आईची ओरड यामुळे लागूनच असलेल्या खोलीमध्ये नागोराव रावते यांचे बंधूंना जाग आली. दार उघडून डोकावताच चोरट्याने त्याच्यावर दगड फेक सुरु केली. आणि सर्व मुद्देमाल दागिने घेऊन पसार झाले. त्याच गावात संभाजी गोविंदराव सादलवाड यांचे किराना दुकानातील गल्ला फोडून तेथील दुकानात असलेली बारा हजार रुपयांची नगदी रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दोन गावात झालेल्या या जबरी जबरी चोरीमुळे परिसरात चोरांची दहशत पसरली आहे.
करंजी येथे चोरी झाल्यानंतर सदर चोरीची माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी काही वेळानंतर घटनास्थळ गाठले परंतु, त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये चोरट्यांचा शोध घेण्याचे कर्तव्य बिटरगाव पोलिसांचे होते. परंतु, तसे न करता पोलिसांनी करंजी येथील घटनास्थळाला भेट देऊन मुख्यालयी परतण्यात धन्यता मानली या यापूर्वीच्या चोरीच्या घटनेतून कुठलाही धडा घेतला नसल्यामुळे चोरांचा आत्मविश्वास बळवला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.