Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नऊ देशांतील नामवंत मल्ल भारतीयांशी भिडणार; 200 पेक्षा अधिक कुस्तींसाठी रथी-महारथी एकाच मंचावर

जामनेरमधील स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरश: वर्षाव होणार, विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि 'देवाभाऊ केसरी' हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान करणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 16, 2025 | 12:47 PM
आज जामनेरमध्ये उसळणार कुस्तीप्रेमींचा जनसागर, नऊ देशांतील नामवंत मल्ल भारतीयांशी भिडणार; 200 पेक्षा अधिक कुस्तींसाठी रथी-महारथी एकाच मंचावर

आज जामनेरमध्ये उसळणार कुस्तीप्रेमींचा जनसागर, नऊ देशांतील नामवंत मल्ल भारतीयांशी भिडणार; 200 पेक्षा अधिक कुस्तींसाठी रथी-महारथी एकाच मंचावर

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : आज 9 देशातील नामवंत आणि कीर्तीवंत पैलवानांसह भारतातील तब्बल 400 पेक्षा अधिक रथी-महारथींमधे होणारी दंगल पाहण्यासाठी जळगावच्या जामनेरमध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. नमो कुस्ती महाकुंभानिमित्त आयोजित देवाभाऊ केसरी स्पर्धेत जागतिक कीर्तीच्या खासबाग आखाड्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या मंचावर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळविरुद्ध आशियाई पदक विजेता जलाल म्हजोयूब, शिवराज राक्षे जगजेता गुलहिर्मो लिमा यांच्याशी भिडण्यासाठी सज्ज झाला आहे.
जामनेरमध्ये कुस्तीचा आखाडा
भारतातील कुस्ती आयोजनाबाबत जामनेरने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. जे आजवर कोणालाही जमले नाही, असे भव्य आणि दिव्य आयोजन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने रविवारी साकार होणार आहे. ही एकदिवसीय कुस्ती दंगल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दिमाखदार लढतीमुळे कुस्तीप्रेमींच्या स्मरणात राहील, असा दृढ विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
महिला कुस्तीपटूंचा सन्मान
या कुस्ती आयोजनानिमित्त महिला कुस्तीलाही समान सन्मान दिला जाणार आहे. तब्बल 50 महिलांच्या कुस्त्या या मंचावर रंगणार असून स्पर्धेची सुरुवात आणि समारोप महिला कुस्तीनेच केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच महिला कुस्तीला हा सन्मान मिळणार असल्यामुळे महिला कुस्तीपटूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रथमच ९ देशांचे मल्ल महामुकाबल्यासाठी भारतात
या महामुकाबल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या कुस्ती इतिहासात प्रथमच तब्बल ९ देशांचे नामवंत महिला आणि पुरुष मल्ल एकाच मंचावर भिडणार आहेत. भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशाचे ऑलिंपियन, जागतिक विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि उप-महाराष्ट्र केसरी असे नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत. हे सुद्धा या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
भारतातील नामांकित मल्ल परदेशी महिलांशी करणार दोन हात
भव्य स्पर्धेत भारतातील नामांकित महिला कुस्तीपटू परदेशी मल्लांविरुद्ध आपली ताकद आजमावणार आहेत. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी ही एस्टोनियाच्या युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूलाशी भिडणार आहे. तसेच विजय चौधरी (विश्व विजेता, ट्रिपल महाराष्ट्र केसरी) वि. सुक्सरोब जॉन (एशिया विजेता- उझबेकिस्तान), प्रतीक्षा बांगडी (पहिली महिला महाराष्ट्र केसरी) वि. अंजलीक गोन्झालेझ (वर्ल्ड चॅम्पियन-फ्रान्स), शिवराज राक्षे (डबल महाराष्ट्र केसरी) वि. गुलहिर्मो लिमा (वर्ल्ड चॅम्पियन), अमृता पुजारी (महिला महाराष्ट्र केसरी) वि. कॅटालिना क्सेन्टने (ऑलीम्पियन – रोमानिया), सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. घेओघे एरहाण (युरोप चॅम्पियन – मोल्दोवा), पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र केसरी) वि. जलाल म्हजोयूब ( आशियाई पदकविजेता – इराण), हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. पै. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन – जॉर्जिया), सुमित मलिक (अर्जुन पुरस्कार, ऑलिंपियन) वि. पै.जस्सा (शेर ए पंजाब) , पृथ्वीराज पाटील (महाराष्ट्र केसरी) वि. पै. जॉन्टी गुज्जर (आंतरराष्ट्रीय विजेता – दिल्ली ), वेताळ शेळके (भवानी केसरी – महाराष्ट्र) वि. दिनेश गोलिया (आंतरराष्ट्रीय विजेता- हरियाणा), फ्लोरिन ट्रिपोन (युरोप चॅम्पियन – रोमानिया) वि. महेंद्र गायकवाड़ (उपमहाराष्ट्र केसरी), भूपिन्दर सिंह (भारत केसरी – पंजाब ) वि. युधिष्ठिर दिल्ली (राष्ट्रीय विजेता-हरियाणा), कमलजित धूमछडी (रुस्तुम ए हिंद – पंजाब) वि. विक्रांत कुमार (राष्ट्रीय विजेता – हरियाणा), सतेंदर मलिक (भारत केसरी – हरियाणा ) वि. योगेश पवार (उप महाराष्ट्र केसरी), बालाराफिक शेख (महाराष्ट्र केसरी) वि. सोनू (हिमाचल केसरी- हरियाणा), हरियाणा माउली जमदाडे (महान भारत केसरी) वि. मनजीत खत्री (भारत केसरी-हरियाणा), शिवा चव्हाण (राष्ट्रीय विजेता – महाराष्ट्र) वि. रजत मंडोथी (त्रिमूर्ती केसरी – हरियाणा), मुन्ना झुंजुर्के (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. हरिओमी ट्रॅक्टर (राष्ट्रीय विजेता- दिल्ली), बाळू बोडके (महाराष्ट्र चॅम्पियन) वि. मनजीत मेला (राष्ट्रीय विजेता- हरियाणा), वेदांतिका पवार (उपमहाराष्ट्र केसरी) वि. शिवानी मेटकर (राष्ट्रीय विजेती), अपेक्षा पाटील (राष्ट्रीय विजेती ) वि. सोनाली मंडलिक (राष्ट्रीय विजेती) या २२ प्रमुख लढतीसोबत स्थानिक ३०० महिला आणि पुरुष पैलवानांच्याही जोरदार कुस्त्या पाहायला मिळणार आहे.
विजेत्यांवर बक्षीसांचा वर्षाव
विजेत्या खेळाडूंना तीन किलो वजनाची चांदीची गदा आणि मानाचा पट्टा ही बहाल केला जाणार असून अव्वल दंगलीतील पराभूत खेळाडूलाही रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.

जामनेरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सहभागी खेळाडूंवर बक्षीसांचा अक्षरश: वर्षाव होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी दिली.

Web Title: Famous wrestlers from nine countries will clash with indians rathi maharathi on one stage for more than 200 wrestling matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Jalgaon

संबंधित बातम्या

Malegaon Blast Case :अपर्णा पुरोहित यांनी सांगितल्या अनेक धक्कादायक गोष्टी
1

Malegaon Blast Case :अपर्णा पुरोहित यांनी सांगितल्या अनेक धक्कादायक गोष्टी

जळगावात खळबळ! पोलीस उपनिरीक्षक निलंबित; तीन तरुणांना आधी नग्न केलं, लैंगिक चाळे करायला सांगितले, नंतर…
2

जळगावात खळबळ! पोलीस उपनिरीक्षक निलंबित; तीन तरुणांना आधी नग्न केलं, लैंगिक चाळे करायला सांगितले, नंतर…

Jalgao crime news: महिलेला घरी सोडतो म्हणत नेले निर्जन जंगलात; आळीपाळीने केला तिघांनी लैंगिक अत्याचार; जळगाव हादरला!
3

Jalgao crime news: महिलेला घरी सोडतो म्हणत नेले निर्जन जंगलात; आळीपाळीने केला तिघांनी लैंगिक अत्याचार; जळगाव हादरला!

Rohini Khadse: “मी त्यांच्या राजीनाम्याची  मागणी करत आहे”; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका
4

Rohini Khadse: “मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे”; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.