
Farmers suffer heavy losses due to heavy rains maharashtra shetkari news update
Maharashtra Farmers News: वारी : राज्यामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतीला मोठा फटका बसला. संगमनेर तालुक्यात स्वाती नक्षत्रात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. मागील महिन्यातील अतिवृष्टीच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या, तोच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांची पुन्हा माती केली आहे.
मागील अतिवृष्टीमुळे सोंगणीस आलेले मका, सोयाबीन, कपाशी आदी पिके मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. सोयाबीनची सोंगणी काही प्रमाणात पूर्ण झाली असली तरी मक्याची सोंगणी अपूर्णच राहिलो. दिवाळीच्या सुट्टीमुळे मजुरांचा तुटवडा भासत असताना झालेल्या परतीच्या पावसाने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. जमिनीवर लोळलेला मका मोड फुटून निकामी होत असून, कपाशीच्या शेतात वेधणीस आलेला कापूस जमिनीवर पडून वाती बनला आहे. तसेच लाल कांदा व उन्हाळ कांद्याच्या रोपांची सड सुरू झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मका, कपाशी व कांद्याचे नुकसान
परतीच्या पावसाने मका, कपाशी व कांद्याचे नुकसान झाले आहे. मजुरांच्या सुट्टीमुळे सोंगणी अपूर्ण, उत्पादन घटले आहे. शासनाची मदत अद्याप कागदावरच आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळवंडली, पुढील हंगाम संकटात सापडले आहेत. पाऊस थांबतो, पण शेतकयांच्या डोळ्यातील अश्रू मात्र थांबत नाहीत.” शासनाने आता तरी जागे होऊन ‘बळीराजाला शब्दांनी नव्हे तर कृतीने दिलासा द्यावा.
शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी
“पिकांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही, परंतु पुढील हंगाम वाचवायचा असेल तर शासनाने तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल.” अशा व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पावसामुळे शेतकरी चार-पाच वर्षे मागे गेला
निसर्गाच्या या सततच्या प्रकोपामुळे बक्षीराजाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही महिन्यातील अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि आता परतीच्या पावसाने शेतकरी अक्षरश हवालदिल झाला आहे. या आर्थिक सववयाने तो चार-पाच वर्ष मागे गेला असून, परिस्थिती अधिकच विकट बनली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ग्रामीण अर्थव्यवस्थेची पावसाने कंबर मोडली
परतीच्या पावसाने पुन्हा एकदा ग्रामीण अर्थव्यवस्थेवी कंबर मोडली आहे. कागदोपत्री घोषणा आणि बैठका यात वेळ घालविण्याऐवजी शासनाने तातडीची आर्थिक मदत बेट शेतक-यांच्या खात्यात पोहोचविण्याची गरज आहे. एका अहवाल आणि पंचनाम्यांनी दिलासा मिळत नाही, कारवाई हाच खरा दिलासा आहे.
बळीराजावर आर्थिक संकट कोसळले
या सर्वामुळे बळीराज्डावर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतक-याना मदतीची घोषणा केली असली तरी अद्याप एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर मदतीचा एक रुपयाही जमा झालेला नाही. परिणामी बळीराजा आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांच्या कचाट्यात सापडलेला आहे.