जैन बोर्डिंग हाऊस जमिन प्रकरणावर धंगेकरांचे भाष्य (फोटो- सोशल मीडिया)
जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहात रद्द करण्याचा ईमेल
शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी दिली प्रतिक्रिया
गोखले बिल्डर्सच्या 230 कोटींचे काय होणार
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीचा व्यवहार अखेर रद्द करण्याची मागणी ईमेलद्वारे केली आहे. दरम्यान हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केल्यावर रवींद्र धंगेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणात मंत्री मुरलीधर मोहोळांवर आरोपांची राळ उठवली होती. त्यानंतर विशाल गोखले यांनी ट्रस्टला ईमेल करत हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनी व्यवहार प्रकरणात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानंतर विशाल गोखले यांनी आपल्या ईमेलमध्ये आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे मला परत करावेत असा ईमेल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मी जैन समाजाला शब्द दिला होता होस्टेलची एक वीटही काढू देणार नाही.
या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मी जैन समाजाला शब्द दिला होता होस्टेलची एक वीटही काढू देणार नाही.
सगळं काही पणाला लावलं, मागे हटलो नाही…
आज होस्टेलचा व्यवहार रद्द होताना आपल्याला दिसतोय. -रवींद्र धंगेकर#saveHND #punelandscam pic.twitter.com/fSk05I0xXe — Ravindra Dhangekar Official (@DhangekarRavii) October 27, 2025
सगळं काही पणाला लावलं, मागे हटलो नाही… आज होस्टेलचा व्यवहार रद्द होताना आपल्याला दिसतोय. – रवींद्र धंगेकर
गोखले बिल्डर्सचे 230 कोटी बुडणार
गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला एक ई-मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. विशाल गोखले यांनी ईमेल लिहीत जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्टीना जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. काही दिवस आधी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहाराला स्थगिती दिली होती. या व्यवहारासाठी जैन बोर्डिंग हाऊसला 230 कोटी रुपये देखील देण्यात आले होते.
गोखले बिल्डर्सचे Jain Boarding House Land प्रकरणातील 230 कोटी बुडणार; धर्मादाय आयुक्तांचा निर्णय काय?
दरम्यान विशाल गोखले यांनी आपल्या ईमेलमध्ये आम्ही हा व्यवहार रद्द करत आहोत, माझे पैसे मला परत करावेत असा ईमेल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर या व्यवहारातून बाहेर पडत असल्याचे ईमेलमध्ये नमूद करण्यात आल्याचे समजते आहे.
बिल्डर विशाल गोखले यांच्या 230 कोटींचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांनी केवळ ईमेल केल्याने हा व्यवहार रद्द होत नाही. झालेल्या करारानुसार हा व्यवहार रद्द झाल्यास विश्वस्त गोखलेंचे पैसे देण्यास बांधील आहेत की नाहीत याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. दरम्यान धर्मादाय आयुक्त याबाबत काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या व्यवहारातील 230 कोटी रुपये गोठवण्यात आले असून, पुढील आदेश येईपर्यंत ते काढता येणार नाहीत, असे आदेश देण्यात आल्याचे समोर येत आहे.






