मुंबई : नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. देशातील अनेक राज्यांमध्ये अकाली उष्णतेमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा वापर झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधील वीज प्रकल्पांमध्येही साठा कमी होऊ लागला आहे. कोल इंडियाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 पॉवर प्लांटमधील कोळशाचा साठा ‘गंभीर’ श्रेणीत आहे. म्हणजेच येथे 7 दिवसांपेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे. जर परिस्थिती सुधारली नाही तर ती ‘सुपर क्रिटिकल’ (तीन दिवसांपेक्षा कमी) श्रेणीत येईल(Crisis of Load Shedding).
उन्हाळा सुरू झाल्याने देशातील वीजनिर्मिती केंद्रांमधील कोळशाचा साठा नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. लॉकडाऊननंतर औद्योगिक उपक्रम पुन्हा रुळावर आल्याने उद्योगधंद्यांमधील विजेचा वापर वाढला आहे. उष्णतेमुळे अनेक वीज कंपन्यांमध्ये मागणी 7-10 ने वाढली आहे. पूर्वीप्रमाणेच कोळसा पुरवठा केला जात आहे. मागणी वाढल्याने ही समस्या निर्माण झाली आहे.
कोळसा कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी दक्षिण भारतातील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा साठा कमी होता. आता यूपी, बिहार आणि झारखंडच्या पॉवर प्लांटमध्येही साठा कमी झाला आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनने (डीव्हीसी) भारत कोकिंग कोल लिमिटेडकडे प्लांटसाठी अधिक कोळशाची मागणी केली आहे. काही डीव्हीसी पॉवर प्लांट्समध्ये फक्त 5-6 दिवसांसाठी कोळशाचा साठा आहे.
सूत्रांनी सांगितले की, कोळसा संकटाचा सामना करण्यासाठी आणि वीजनिर्मिती सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकार खाणींजवळील प्लांटसाठी लिंकेज कोळशावर राज्यांना 25 टक्के टोलिंग सुविधा देणार आहे. या अंतर्गत आयातीत कोळशामध्ये देशी कोळसा मिसळला जातो. आयात केलेल्या कोळशावर आधारित वीज प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तापमान वाढल्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये वीजपुरवठा खंडित होत आहे. केंद्रीय मंत्री आर.के. सिंह म्हणाले की, कोळशाच्या कमतरतेमुळे काही राज्यांमध्ये वीज संकट निर्माण होऊ शकते. कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीत अडचणी निर्माण होत आहेत. आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूमध्ये कोळशाचा तुटवडा आहे.
३० टक्के प्लांटमध्ये ७ दिवसांपेक्षा कमी कोळसा शिल्लक आहे. वीज पुरवठ्याची मागणी 10 टक्क्यांनी वाढली आहे. यूपी प्लांटमध्ये 26% साठा शिल्लक आहे. 38 वर्षांत प्रथमच एप्रिलमध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात 1.5 दिवसांचा साठा शिल्लक आहे.
राज्याला कोळसा आणि वीज संकटाचा सामना करावा लागत असल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. काही प्लांटमध्ये दीड दिवस तर काही प्लांटमध्ये 3 ते 6 दिवस कोळसा शिल्लक आहे.
गेल्या आठवडाभरात मागणीत 1.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोळशाचे गंभीर संकट असताना ऑक्टोबरमध्ये मागणी 1% वाढली. मार्च महिन्यात 5 टक्के वाढ झाली. देशातील कोळशाचा साठा 14 ते 15 दिवसांऐवजी 9 दिवसांचा आहे. मागणी वाढल्याच्या प्रमाणात पुरवठा वाढला नाही. युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या किमतीत वाढ झाली.
राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे. बाहेरील कोळसा राज्यातील पॉवर पॉईंटला जास्तीच्या प्रमाणात चालत नाही. मात्र परदेशी आणि देशी कोळसा वापरून विजेचे संकट दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यात 3 ते 4 हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. विजेची मागणी लक्षात घेता शेजारील राज्यातून वीज विकत घेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]






