पुणे: महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि बदनामी केली जात आहे. विशेषतः भाजपच्या नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये वारंवार केली जात असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.संभाजी ब्रिगेडने भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते” या प्रकारचे विधान संसदेच्या सभागृहात करणे अत्यंत निषेधार्ह आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांची तुलना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते.” भाजप खासदाराचे हे दुर्दैवी आणि आक्षेपार्ह वक्तव्य प्रशांत कोरटकरसारख्या लोकांना पाठबळ देणारे आहे.संभाजी ब्रिगेडने सरकारवरही निशाणा साधत, “औरंग्याच्या कबरीवर आग लावण्याची भाषा करणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांनी आणि भाजप नेत्यांनी पुरोहित प्रकरणावरही प्रतिक्रिया द्यावी,” असे आवाहन केले आहे. तसेच, प्रशांत कोरटकर याला अजूनही अटक न झाल्याबाबत सरकारवर आरोप केला आहे. संभाजी ब्रिगेडने तमाम शिवप्रेमींना आवाहन केले आहे की, “या मनुवादींच्या कटकारस्थानांविरोधात लढा देण्याची वेळ आली आहे.” त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिवद्रोह्यांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
‘नरेंद्र मोदी पूर्वीजन्मीचे शिवाजी महाराज…’; भाजप खासदाराच्या
भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळे संसदेत एकच खळबळ उडाली. भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी “नरेंद्र मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि उपसभापतींनी ते विधान सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले.
प्रदीप पुरोहित यांनी सांगितले की, “गिरिजा बाबा नावाच्या एका संताने मला सांगितले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म छत्रपती शिवाजी महाराज म्हणून झाला होता. त्यामुळेच ते राष्ट्र उभारणीचे कार्य करत आहेत. या विधानावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी यावर टीका केली आहे.
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा भारातातील कोणत्या राज्याशी आहे संबंध?
भाजपा खासदार प्रदीप पुरोहित यांच्या वादग्रस्त विधानावर मोठा गदारोळ उडाला. सोशल मीडियावरही त्यांच्या या वक्तव्याची तीव्र टीका केली जात आहे.
काँग्रेसच्या खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “अखंड भारताचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचा आणि महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा भाजपकडून सुनियोजित कट रचला जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मानद टोपी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिरावर ठेवून मोठा अपमान केला आहे. आता या भाजप खासदाराने दिलेले हे घृणास्पद वक्तव्य ऐका. आम्ही शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा तीव्र निषेध करतो. भाजप ही शिवद्रोही आहे. आम्ही हा अपमान सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.” या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे.