Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर माढ्याचे गणित जुळलं; धैर्यशील मोहिते पाटीलांचा तुतारी फुंकणार; दोन दिवसांत करणार शरद पवार गटात प्रवेश

अनेक दिवसांपासून माढ्याच्या जागेचा असलेला तिढा आता सुटलेला आहे. सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. माढ्यातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 11, 2024 | 06:55 PM
Finally, the math of Madha has come true. The courageous Mohite Patil will join Sharad Pawar's NCP

Finally, the math of Madha has come true. The courageous Mohite Patil will join Sharad Pawar's NCP

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : लोकसभेचे बिगूल वाजले आणि प्रत्येक पक्षाची जागांची आकडेवारी सुरू झाली. माढाच्या जागेचा तिढा अनेक दिवस होता, परंतु तो आता सुटला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारीची कोंडी फुटली असून, धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याविरोधात दोन हात करतील.

१४ एप्रिल रोजी होणार जाहीर प्रवेश

अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात १४ एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्या पक्षप्रवेशाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, बाळदादा मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम

भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह कायम ठेवला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील हेच शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर माढा लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्य प्रवेश करतील.

धैर्यशील मोहिते पाटीलांचा निर्णय

गेल्या तीन आठवड्यांपासून मोहिते पाटील-पवार यांच्यात गाठीभेटी होत होत्या. भाजपवर दबावतंत्राचा वापर करून उमेदवार बदलण्याची मागणी मोहिते पाटील करत होते पण भाजपने तशी कोणतीही पावले उचलली नसल्याने अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.

अकलूजच्या मोहिते पाटलांना फलटणच्या नाईक निंबाळकरांची साथ लाभणार सातारा व माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची यापूर्वीच घोषणा केली आहे. आता त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यांना फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर तसेच संजीवराजे नाईक निंबाळकरांची बहुमूल्य साथ लाभणार असल्याची चर्चा आहे.
भाजपकडून मोहिते पाटलांच्या बंडखोरीकडे दुर्लक्ष
माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस, करमाळा, माढा, सांगोला, फलटण आणि माण-खटाव हे तालुके येतात. या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांनी बंडखोरी केली, तरी रणजितसिंह निंबाळकर यांना फारसा फरक पडणार नाही, असे चित्र आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांना भेटून भाजप नेत्यांनी चर्चा केली; परंतु त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांना आता भेटणे बंद केले आहे. त्यामुळेच मोहिते पाटील गटाने पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जाण्यासंबंधीचा निर्णय घेतला.

Web Title: Finally madhas lok sabha 2024 seat problem solved dhairyasheel mohite patil will join sharad pawars ncp nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2024 | 06:55 PM

Topics:  

  • Bharatiya Janata Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.