
Fire brigade vehicle breaks down on helipad prepared for CM Devendra Fadnavis Nanded
Nanded News : लोहा : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेते २७ नोव्हेंबर रोजी लोहा शहरात आले होते. मुख्यमंत्री यांच्या हेलिकॉप्टरसाठी कंधार रस्त्यालागत शहरापासून जवळपास तीन किमी अंतरावर असलेल्या चव्हाण यांच्या शेतात हेलिपॅड तयार करण्यात आले होते. मात्र त्यादरम्यान हेलिपॅड मैदानावर पाणी टाकण्यासाठी गेलेले अग्निशमन वाहन तांत्रिक बिघाडामुळे तेथेच मागील तेरा दिवसांपासून बंद अवस्थेत उभे आहे.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या सभा मोठ्या प्रमाणात झाल्या. वेळेची बचत व्हावी आणि प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायती मधील भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पोहचता यावे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेलिकॉप्टर द्वारे राज्यात प्रचाराचे रान उठवले होते.
हे देखील वाचा : रिक्स नकोच रे बाबा! निकालापर्यंत EVM स्ट्राँगरूमला काँग्रेसचा २४ तास कडक पहारा
दि. २७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठ्या लवाजम्यासह लोहा नगरीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते.
सदर हेलिपॅडच्या कामासाठी लोहा पालिकेचे अग्निशमन वाहन कर्मचाऱ्यांसह नेण्यात आले. मात्र अग्निशमन वाहन पाणी टाकत असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन बंद पडले. जवळपास तेरा दिवस उलटून देखील सदरील वाहनातील तांत्रिक बिघाड दूर होऊ शकला नाही. शहरात एखादी ज्वलनशील गंभीर घटना घडल्यास कंधार किंवा जिल्ह्यावरून अग्निशमन वाहन बोलावून घ्यावे लागेल. त्यास किती उशीर होईल..? तोपर्यंत मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रशासनाने तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.
हे देखील वाचा : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
दोन कर्मचारी नियुक्त
नादुरुस्त अग्निशमन वाहन सुरक्षेसाठी दोन कर्मचारी कडाक्याच्या थंडीत नियुक्त असल्याची माहिती जायमोक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. तसेच त्यांनी वाहनाचे पार्ट नागपूर वरून आल्यानंतर वाहन सुधारेल असेही सांगितले.
बिघाड दूर होऊ शकला नाही.