Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला सक्षमीकरणावर उमटले प्रश्नचिन्ह? महिला नगरसेविकांच्या खुर्च्यांवर पुरुषराज! पती, पिता किंवा पुत्राने घेतला कारभार हाती

हिंगोली नगरपालिकेतील अर्थसंकल्पीय बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे या धोरणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महिला नगरसेविकांच्या ऐवजी त्यांचे कुटुंबीय किंवा नातलग हे अर्थसंकल्पीय बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Mar 01, 2026 | 05:38 PM
male family members sitting in the seats of female corporators Hingoli news

male family members sitting in the seats of female corporators Hingoli news

Follow Us
Close
Follow Us:

Hingoli News : हिंगोली : नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये महिलांना ५० टक्के राजकीय आरक्षण देऊन त्यांना निर्णयप्रक्रियेत सक्षम करण्याचा शासनाचा उद्देश असताना हिंगोली नगरपालिकेतील अर्थसंकल्पीय बैठकीत घडलेल्या प्रकारामुळे या धोरणावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महिला नगरसेविकांच्या ऐवजी त्यांचे कुटुंबीय किंवा नातलग हे अर्थसंकल्पीय बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले आहे.

हिंगोली महापालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्पीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र यावेळी एक धक्कादायक प्रकार घडलेला दिसून आला आहे. या बैठकीला एकूण १७ महिला नगरसेविका असताना केवळ एकमेव नगरसेविका उपस्थित होत्या. उर्वरित तब्बल १६ जागांवर त्यांच्या पती, पिता किंवा पुत्र अशा नातेवाईकांनीच खुर्च्या व्यापल्याचे चित्र दिसून आले. महिला आरक्षणाचा उद्देश महिलांना स्वनिर्णयाचा अधिकार देणे हा असताना प्रत्यक्षात सत्ता पुरुष नातेवाईकांच्या हातीच असल्याची वस्तुस्थिती समोर आली.

हे देखील वाचा : सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन अखेर मागे! दोन सुपरवायझर सफाई कामातून दूर

आरक्षणाची अंमलबजावणी कागदोपत्री ?
हिंगोली जिल्ह्यात वसमत, कळमनुरी व हिंगोली या तीनही नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदे महिलांकडे आहेत. तसेच नगरसेवक पदांमध्येही ५० टक्के आरक्षण लागू आहे. मात्र महिलांच्या जागेवर पुरुष नातेवाईक बसत असतील, तर आरक्षणाचा मूळ हेतूच हरवतो, अशी तीव्र चर्चा शहरात
रंगली आहे. सभागृहात अधिकृत सदस्यांव्यतिरिक्त इतरांना मज्जाव असतानाही हा प्रकार घडला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे. महिला सक्षमीकरणाच्या गजरातच महिला आरक्षणाची पायमल्ली होत आहे.

हे देखील वाचा : जावळीत सभापतिपदाच्या खुर्चीसाठी ‘ओढाताण’ सुरूच; मतदारांनी नेत्यांच्या डोळ्यात घातले ‘अंजन’

मुख्याधिकारी नॉट रिचेबल
नियमांची अशा प्रकारची पायमल्ली होत असेल, तर ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.या प्रकाराबाबत मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे.  या संदर्भात सभागृहातील फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याने आता मुख्याधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Male family members sitting in the seats of female corporators hingoli news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Hingoli News
  • Hingoli Politics
  • nanded news

संबंधित बातम्या

महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी
1

महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी

Nanded News : नांदेड अर्थसंकल्प अभ्यासात अडकला; सर्वसाधारण सभेसमोर कधी सादर होणार सादर?
2

Nanded News : नांदेड अर्थसंकल्प अभ्यासात अडकला; सर्वसाधारण सभेसमोर कधी सादर होणार सादर?

Maharashtra Politics : नांदेडमध्ये RSS विरुद्ध खासदार; संघ पदाधिकाऱ्यांचे अनावृत पत्र व्हायरल
3

Maharashtra Politics : नांदेडमध्ये RSS विरुद्ध खासदार; संघ पदाधिकाऱ्यांचे अनावृत पत्र व्हायरल

Cyber Crime News : निवृत्त शिक्षकाची फसवणूक; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून लुटले
4

Cyber Crime News : निवृत्त शिक्षकाची फसवणूक; ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून लुटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.