Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी

मागणीच्या तुलनेत आवक अधिक झाल्याने टोमॅटो आणि शेवगा यांच्या भावात घसरण नोंदविण्यात आली, तर काकडीच्या भावात वाढ झाली. इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 26, 2026 | 11:44 AM
मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी

मार्केटयार्डात भाजीपाला-फळांच्या दरात चढ-उतार! काकडी, डाळींब व फुलांना बाजारात वाढती मागणी

Follow Us
Close
Follow Us:

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक अधिक झाल्याने टोमॅटो आणि शेवगा यांच्या भावात घसरण नोंदविण्यात आली, तर काकडीच्या भावात वाढ झाली. इतर बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.(फोटो सौजन्य – istock)

कोथिंबीरला कवडीमोल भाव, जनावरे पिकात सोडले; शेतकरी मोठ्या संकटात

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १२ ते १३ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्रप्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग कर्नाटक व गुजरातमधून प्रत्येकी १ टेम्पो, मध्यप्रदेश व राजस्थानातून मटार २५ ते २६ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो, तर इंदौर, आग्रा व स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती.

गुलटेकडी मार्केटयार्डात कोथिंबीर, शेपू व पुदिन्याच्या भावात वाढ झाली असून इतर सर्व पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्याऱ्यांनी सांगितले, पालेभाज्यामध्ये कोथिंबिरीची सुमारे १ लाख जुडी, मेथी ६० हजार जुडी, तर हरभऱ्याची सुमारे १२ हजार जुडी आवक झाली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव (रुपये) कोथिंबीर १२००-२०००, मेथी ५००-८००, शेपू ५००-१०००, कादापात १०००-१५००, चाकवत ५००-८००, करडई ३००-८००, पुदिना ५००-१०००, अंबाडी ५००-८००, मुळे १०००-१५००, राजगिरा ५००-८००, चुका ५००-८००, चवळई ६००-१०००, पालक ८००-१५००, हरभरा गड्डी ५००-१०००, कांदा १००-१५०, बटाटा ७०-१४०, लसूण ५००-१२००, सातारी आले ३००-५००, भेंडी ३००-५००, गवार ७००-१०००, टोमॅटो १००-१५०, दोडका ३५०-४५०, हिरवी मिरची ५००-७५०, दुधी भोपळा १००-१५०, चवळी २००-३००, काकडी ४००-४५०, कारली (हिरवी) ४००-४५०, (पांढरी) ३००-३५०, पापडी ३००-३५०, पडवळ २००-२५०, फ्लॉवर १००-२००, कोबी ७०-१४०, वांगी २००-४००, डिंगरी ३५०-४००, नवलकोल १००-१२०, ढोबळी मिरची ४००-५००, तोंडली (कळी) ५००, (जाड) २००-२५०, शेवगा ५००-१०००, गाजर ५००-१०००, वालवर २५०-३००, बीट १००-२००, घेवडा ३००-४००, कोहळा १००-१५०, आर्वी २५०-३००, घोसावळे २००-२५०, ढेमसे २५०-३००, भुईमूग शेंग ७००-९००, मटार (परराज्य) २६०-३००, पावटा ३००-३५०, तांबडा भोपळा १००-२५०, तोतापुरी कैरी १८०० २०००, सुरण २००-२२०, मका कणीस ५०-१००, नारळ (शेकडा) १०००-१६०० एवढा भाव आहे.

Pune News: पुण्याची वाहतूक कोंडी सुटणार? ‘या’ मेट्रो लाईनच्या विस्ताराला गती

फुलांना मागणी वाढली:

पुणे, गुलटेकडी मार्केटयाडांतील फुलबाजारात सर्व फुलांची आवक वाढली रथसप्तमी आहे. व प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढल्याने फुलांच्या दरात १० ते २० वाढ टक्क्यांनी झाल्याची माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली. झेंडू गुलछडी २०-६०, १५०-२००, अॅष्टर (जुडी) ३०-५०, सुट्टा १००-१५०, कापरी ६०-१००, शेवंती ६०-१२०, गुलाबगड्डी ३०-६०, गुलछडी काडी ५०-१५०, डच गुलाब (२० नग) १५०-३००, जर्बेरा ४०-६०, कार्नेशियन १५०-२५०, शेवंती काडी १५०-३००, लिलियम (१० काड्‌या) ८००-१०००, ऑर्किड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) ८०-१२०, जिप्सोफिला २५०-३५०, लीली इत्यादी फुलांना मोठी मागणी आहे.

Web Title: Fluctuations in the price of vegetables and fruits in the market yard growing demand for cucumbers pomegranates and flowers in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Pune
  • Vegetable prices

संबंधित बातम्या

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
1

Pune Crime: “वंशाला दिवा हवा” म्हणत गर्भपातास भाग पाडले; हुंड्यासाठी 25 लाख, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत
2

Latur News: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई; पुण्यातील खून प्रकरणातील 5 आरोपींना लातुरात अटकेत

Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव
3

Pune Crime: सोन्याच्या दागिन्यांची मागणी करत होती पत्नी; संतापून पतीने चाकूने वार करत घेतला जीव

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL
4

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.