Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर 250 गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर दाखल, शिवसेनेत केला पक्षप्रवेश, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण

  • By युवराज भगत
Updated On: Aug 21, 2023 | 04:10 PM
पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर 250 गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर दाखल, शिवसेनेत केला पक्षप्रवेश, राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण
Follow Us
Close
Follow Us:
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व बदल पाहायला मिळाले. राज्यातील प्रमुख दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर झालेले आरोप-प्रत्यारोप यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. असे असताना पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी शिशिर धारकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत. २५० गाड्यांचा ताफा घेऊन धारकर ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
धारकर यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी केले स्वागतपर संबोधन
सगळ्यांचे शिवसेनेत स्वागत, तुम्ही लढवयांच्या सेनेत प्रवेश केला आहात. काहीजण बघितले आव मोठा आणतात डोळे वटारले की पळून गेले, तुम्ही पळकुठे नाहीत याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावर वार करणे आपली ख्याती आहे. अन्याय सहन करायचा नाही. तसे पाहायचे तर तुम्हाला सोपा मार्ग होता वॉशिंग मशिनमध्ये जाऊ शकले असते. पण कर नाही त्याला डर कशाला. वॉशिंग मशिनमध्ये जायच्या ऐवजी लढवयांच्या सेनेत आलात. संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपणा टिकतं नाही म्हणतात पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची आहे. भगवा हातातून सुटू देऊ नका, तुम्ही तारीख ठरवा पेणला सभा घेऊ.
शिवसेना नेते अनंत गिते यांनी दिला शब्द
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिशिर धारकर यांचा आज पक्षप्रवेश होत आहे. यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते पक्ष प्रवेश करीत आहेत. तुम्ही जो उत्साह दाखवला आहे, हा प्रवेश पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्ष प्रवेश असेल. मी उद्धव ठाकरे यांना शब्द देतो की, पुढचा पेणचा आमदार आपलाच असेल.

पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी

शिशिर धारकर हे पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात आरोपी होते. त्यांना ठाकरे गटात पक्ष प्रवेश दिला जात असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धारकर हे गेली अनेक वर्ष राजकारणापासून लांब होते. मात्र आता ते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात पक्ष प्रवेश करत आहेत.

कोण आहेत शिशिर धारकर?

शिशिर धारकर पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. धारकर हे पेण अर्बन बँक घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपी होते. ५०० कोटी पेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पेण शहरात त्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष असल्याचं बोलले जाते. शिशिर धारकर यांनीच पैसे बुडवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.

गेल्या काही वर्षात धारकर राजकारणात सक्रिय नसल्याचेदेखील बोलले जात आहे. याआधीही शिशिर यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी दोन-तीन भेटी घेतल्याची चर्चा आहे, मात्र प्रवेश होऊ शकला नव्हता. अशातच उद्धव ठाकरे यांनी शिशिर धारकर पिता-पुत्रांना पक्ष प्रवेश दिल्यामुळे त्यांना किती बळ मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पेणवर भाजपचे रविंद्र पाटील स्थानिक आमदारांचे वर्चस्व

काही वर्षांपूर्वी पेण मतदारसंघावर शिशिर धारकर यांचे वर्चस्व होते मात्र सध्या भाजपचे रविंद्र पाटील स्थानिक आमदार असून पेण नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. पेण अर्बन बँक घोटाळ्यानंतर आमदार रविंद्र पाटील यांनी आपले वर्चस्व अद्यापही कायम ठेवले आहे.

वडील काँग्रेसच्या काळात राज्यमंत्री

शिशिर धारकर यांचे वडील आप्पासाहेब धारकर हे काँग्रेसच्या काळात राज्यमंत्री होते. आप्पासाहेब धारकर १९८० ते १९८६ व १९९० ते १९९६ ह्या कालावधीत ते विधान परिषद सदस्य होते. ६ मार्च १९९३ रोजी आप्पासाहेब धारकर महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते. याच काळात ते रायगडचे पालक मंत्री सुद्धा होते.

 

Web Title: Former mayor of pen shishir dharkar entered matoshri with a convoy of 250 cars joined the shiv sena became a hot topic in political circles nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2023 | 04:10 PM

Topics:  

  • Uddhav Balasaheb Thackeray

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.