अहमदनगर : महाराष्ट्राचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांनी लैंगिक छळाच्या गंभीर आरोपात अटक केली. माजी आमदार मुरकुटे हे मुंबईहून अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या घरी परतत असताना या प्रकरणी राहुरी पोलिसांच्या पथकाने त्यांना अटक केली. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर भानुदास मुरकुटे यांना अटक करण्यात आली. मुरकुटेंवर वेगवेगळ्या कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने गेल्या सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केली होती. 2019 पासून मुरकुटे संबंधित पिडीत महिलेवर लैंगित अत्याचार करत होते. असा आरोपही महिलनेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पोलिसांनी मुरकुटे यांना श्रीरामपूर येथील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आणि त्यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुरकुटे याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हेही वाचा: तुमच्या हाताच्या अंगठ्यावरून व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणून घ्या
माजी आमदार मुरकुटे हे यापूर्वी काँग्रेस आणि जनता दलाशी संबंधित होते. मुरकुटे यांनी विधानसभेत तीन वेळा श्रीरामपूरचे प्रतिनिधीत्व केले आहे. अनेक दिवसांपासून ते राजकारणात सक्रिय दिसत आहेत. अशोका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकही आहेत. अलीकडेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रवास केल्यानंतर त्यांनी भारत राष्ट्र समिती राष्ट्रीय समिती पक्षात प्रवेश केला.
मुरकुटे हे त्यांच्या आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी श्रीरामपूरचा पाणीप्रश्न आणि अशोका कारखान्याच्या ऊस घोटाळ्याबाबत महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार टीका केली होती.
हेही वाचा: हरयाणाच्या निकालाचा महाराष्ट्रातही होणार परिणाम; महायुतीने बदलली ‘ही’ स्ट्रॅटेजी